स्मार्टफोन बाजारात भारतात लक्षणीय वाढ

नवी दिल्ली दि. ३ – भारतीय बाजारात सध्याच पंचवीस स्मार्टफोन कंपन्या आपापली उत्पादने विक्री करत असतानाच आणखी कांही नव्या कंपन्याही भारतात येऊ घातल्या आहेत परिणामी २०१२ सालात स्मार्टफोन आणि फिचर फोन व्यवसायात भारतात लक्षणीय वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवड्यातच जिओनी या चीनी स्मार्टफोननेही भारतीय बाजारात प्रवेश केला आहे.

या संदर्भात सायबर मिडिया रिसर्च संस्थेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार २०१२ सालात १ कोटी ५२ लाख हँडसेट विक्री झाली असून २०११ च्या तुलनेत ही वाढ ३५.७ टक्के इतकी आहे. भारतात फिचर फोनला ग्राहकांची नेहमीच जास्त पसंती राहिली आहे हेही या आकडेवारीवरून स्पष्ट झाले असून २०१२ मध्ये २० कोटींहून अधिक फिचर फोन विकले गेले आहेत. ही वाढ २०११ च्या तुलनेत १९.९ टक्के इतकी आहे.

फोन उत्पादक कंपन्यात फिचर फोन बाजारात नोकिया प्रथम क्रमांकावर असून  त्यांचा बाजारातील वाटा २१.८ टक्के आहे. दुसर्या  क्रमांकावर सॅमसंग १३.७ टक्के तर तिसर्यार क्रमांकावर मायक्रोमॅक्स ६.६ टक्के आहेत. स्मार्टफोन विक्रीत मात्र सॅमसंगचे वर्चस्व असून त्यांचा बाजारातील वाटा ४३.१ टक्के इतका आहे. त्या खालोखाल नोकिया, सोनी आणि ब्लॅक बेरी यांचा क्रमांक आहे. भारतीय मायक्रोमॅक्स, कार्बन आणि लावा या कंपन्यंनी स्मार्टफोनशी चांगली स्पर्धा केली असली तरी आगामी पाच वर्षात स्मार्टफोनचा व्यवसाय ५७ टक्कयांनी वाढेल असाही अंदाज जाणकार वर्तवित आहेत.

Leave a Comment