
मुंबई दि.३ – मुंबई क्रिकेट असोसिएनच्या मुख्य सिलेक्टरपदाचा माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी राजीनामा दिला असून तसे पत्र मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव नितीन दलाल यांच्याकडे दिले असल्याचे वृत्त आहे.
मुंबई दि.३ – मुंबई क्रिकेट असोसिएनच्या मुख्य सिलेक्टरपदाचा माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी राजीनामा दिला असून तसे पत्र मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव नितीन दलाल यांच्याकडे दिले असल्याचे वृत्त आहे.
पाटील यांनी आपल्या पदाच्या राजीनाम्याचे पत्र मंगळवारीच दलाल याच्याकडे दिले असले तरी व्यवस्थापन समितीने अजून राजीनामा स्वीकारलेला नाही असे दलाल यांनी सांगितले. ते म्हणाले की या राजीनामा पत्रावर व्यवस्थापन समिती पुढील बैठकीत चर्चा व विचारविनिमय करणार आहे.
पाटील यांनी राजीनामा देताना स्थानिक मॅचेस पाहणे आपल्याला जमत नाही व त्यामुळे मॉरल ग्राऊंडवर आपण हा राजीनामा देत आहोत असे म्हटले आहे. तर कांही जणांच्या मते संदीप पाटील यांना त्यांच्यावर सोपविलेली जबाबदारी निटपणे पार पाडता आलेली नाही म्हणून हा राजीनामा दिला आहे.