सरकार मला केव्हाही तुरुंगात टाकेल- मुलायम

नवी दिल्ली, दि.3 -समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह आणि बेनीप्रसाद वर्मा यांच्या गेल्या काही दिवसापासून सतत शाब्दिक चकमकी होत आहे. मुलायम यांनी काँग्रेसमधील बड्या नेत्यांवर चांगल्याच तोफाही डागल्या आहेत. पंतप्रधानपदाच्या दावेदारीवरुन काँग्रेसमध्ये घमासान सुरु झाले असतानाच, सपा सुप्रीमो मुलायम सिंह यादवांच्या वक्तव्याने व त्यांच्याशी शाब्दिक युद्ध खेळत असलेले बेनी प्रसाद वर्माच्या भेटीं धक्कातंत्रामुळे राजकीय वातावरण तापले गेले आहे. बेनी प्रसाद यांनी समाजवादी पक्षातील माजी नेते व खासदार अमर सिंग यांची भेट घेतली. मुलायम यांनी पुन्हा एकदा केंद्रातील काँग्रेसच्या रणनितीवर हल्लाबोल केला आहे. मुलायम यांनी सरकारवर हल्ला चढविताना म्हटले आहे की, केंद्र सरकार मला तुरुंगात डांबू शकते. मुलायम पुढे म्हणतात, सरकारकडे हजारो हात असून ते मला कोणत्याही हाताने तुरुंगात घालवू शकतील.

मुलायम म्हणाले, काय काँग्रेसशी लढणे सोपी गोष्ट आहे?. केंद्र सरकार मला सीबीआयद्वारे जेलमध्ये टाकू शकते. तसेच मागील काही दिवसात मी भाजप नेते लालकृष्ण अडवानी यांची केलेली स्तुती खरी होती. तसेच पोलादमंत्री बेनी प्रसाद वर्मा यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली.

बेनी प्रसाद वर्मा यांनी बुधवारी काँग्रेस महासचिव जनार्दन द्विवेदी यांची भेट घेतली. सपा प्रमुख मुलायम सिंहसोबत होत असलेल्या शाब्दिक लढाईबाबत बेनी म्हणाले, सपाने गरळ ओखली तर आम्हीही तयार आहोत. अमर सिंगसोबत झालेल्या भेटीच्या तपशिलाबाबत विचारले असता त्यांनी चुप्पी साधली. या प्रश्नावर ते काहीच न बोलता आपल्या कारमध्ये गपचिप निघून गेले.