पुरूषांमधला वाय क्रोमोसोम नष्ट होण्याच्या मार्गावर?

मेलबर्न दि. ३ -अपत्याचे लिंग ठरताना महत्त्वाची भूमिका बजावणारा आणि फक्त पुरूषांमध्येच असणारा वाय हा क्रोमेासोम दुबळा बनत असून भविष्यात तो नष्टच झालेला असेल अशी भीती संशोधकांनी व्यक्त केली आहे. हा क्रोमोसोम दुबळा बनण्याचा वेग लक्षणीय असल्याचे संशोधक जेनी ग्रेव्हस यांचे म्हणणे आहे. कॅनबेरा विद्यापीठाच्या अप्लाईड इकॉलॉजी विभागत जेनी जेनेटिसिक्स म्हणून काय करतात. अर्थात हा क्रोमोसोम पूर्णपणे लुप्त होण्यासाठी कदाचित लक्षावधी वर्षे लागू शकतील मात्र आत्ताच दुर्गम भागात राहणार्याह कांही समूहातील व्यक्तीमध्ये तो नष्ट होत चालला आहे असे त्यांचे म्हणणे आहे.

कांही वर्षांपूर्वीच जेनी यांनी हा अंदाज वर्तविला होता मात्र सध्या त्या ज्या ऑस्ट्रेलियन प्राण्यांवर या संदर्भातले संशोधन करत आहेत त्यातून त्यांना आता ही खात्री पटली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. प्राण्यांमधील लिंग ठरविणार्‍या जनुकांचाच अभ्यास त्या करत आहेत आणि माणसातही लिंग ठरविणारी हीच जनुके आहेत असे सांगून त्या म्हणाल्या की स्त्री बीजाशी पुरूषांमधील वाय क्रोमोसोमचा संयोग झाला तर मुलगा जन्मास येतो आणि एक्स क्रोमोसोमचा संयोग झाला तर मुलगी जन्मास येते हे सर्वांनाच माहिती आहे.

वाय क्रोमोसोम फक्त पुरूषांतच असतो आणि तो एकटाच असतो त्या उलट स्त्रीमध्ये एक्स क्रोमोसोमची जोडी असते. त्यामुळे मादीमधील क्रोमोसोम पेशी वारंवार विभाजित झाल्या आणि त्यामुळे जनुकात बदल झाला तरी क्रोमोसोमच्या जोडीमुळे बदल सहसा होत नाही. मात्र पुरूषांमधील वाय आणि एक्स क्रोमोसोम एकएकटे असल्याने त्या पेशी वारंवार दुभंगत राहिल्या तर होणारे जनुकीय बदल तसेच राहतात व त्यातूनच हे क्रोमोसोम दुबळे बनतात. त्यामुळेच कालांतराने हा क्रोमोसोम नष्ट होणार हे निश्चत आहे.

Leave a Comment