नवी दिल्ली, दि. 3 – देशाच्या व्यावसायिक क्षेत्रात सध्या विनाकारण निराशवादी चित्र आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत सध्या काहीशी घसरण झाली आहे हे जरी खरे असले तरी ही घसरण तात्पुरत्या स्वरूपाची असून देश पुन्हा आठ टक्के इतका विकास दर गाठू शकतो असे पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी म्हटले आहे.
सध्या देशाचा विकास दर पाच टक्कक्यांवर आला आहे. ही चांगली स्थिती नाही. तथापी जागतिक मंदीचा देशातील स्थितीवर परिणाम झाला आहे. आपल्याला पुर्ण क्षमतेने प्रगती साधायची असेल तर यात येणारे अडथळे आपल्याला दूर करावे लागतील असे ते म्हणाले. भारतीय उद्योग महासंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. ते म्हणाले की सध्या देशाच्या अर्थव्यवस्थेत आलेली घसरण ही तात्पुरत्या स्वूूरूपाची आहे. ती कायम राहणारी नाही हंी बाब ध्यानात ठेवली पाहिजे.या स्थितीला जागतिक मंदीही बर्याच अंशी कारणीभूत आहे. तथापी जागतिक मंदी दूर करण्यासाठी आपण काही करू शकत नाही.जग पुन्हा विकासाच्या मार्गावर येईल याचीच वाट आपल्याला पहात बसावे लागेल परंतु या परिस्थितीला तोंड देण्यासाठी देशांतर्गत जे अडथळे येत आहेत ते आपल्याला दूर करावे लागेल असे ते म्हणाले.
थेट विदेशी गुंतवणुकीच्या धोरणाचा व्यापक फेर आढावा घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. या संबंधात मंत्रीमंडळाच्या उपसमितीने केलेल्या कामावर आपण प्रभावित झालो आहोत असे त्यांनी नमूद केले.देशात सध्या वित्तीय तुटीचे प्रमाण वाढत आहे त्यावर नियंत्रण ठेवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. वाढती वित्तीय तुट आपल्याला मान्यच नाही असे ते म्हणाले.सन 2016-17 पर्यंत वित्तीय तुटीचे प्रमाण 3 टक्के इतके खाली आणण्याचा सरकारचा निर्धार आहे असे ते म्हणाले.उद्योग क्षेत्राने सरकारच्या निर्धारावर विश्वास ठेवावा विनाकारण नकारात्मकता जोपासू नये अशी सुचनाहंी त्यांनी केली