:बांधकाम क्षेत्रात यंत्रे बनविणारी चीनी कंपनी पुण्यात

पुणे दि २ :बांधकाम क्षेत्रात लागणारी यंत्रे बनविणारी जगातील आघाडीची चीनी कंपनी सानी हेवी इंडस्ट्री ने पुण्याजवळ चाकण एम आय डीसी मध्ये भारतीय उद्योगांना मोठी स्पर्धा निर्माण केली आहे. कंपनीने आतापर्यंत ६०० कोटी रुपये गुंतवणूक केली असून येत्या तीन वर्षात आणखी ३०० कोटी रुपये गुंतविले जातील अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक अलेक्स वू यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. चीनबाहेर या कंपनीचा हा सर्वात मोठा प्रकल्प आहे.
बांधकाम यंत्र निर्मिती क्षेत्रात ड्रगनचा प्रवेश झाला असल्याने मंदीच्या काळातही दर्जा आणि सेवा या दोन आघाड्यावर भारतीय उद्योगांना स्पर्धा करावी लागेल आणि आम्ही अल्पावधीत बाजारपेठेवर ठसा उमटवू असा विश्वास व्यक्त करून ते म्हणाले की मो बा ईल , कॉलर करेन सध्या आम्ही आयात करत असलो तरी २०१४ अखेर स्थानिक छोट्या उद्योगांकडून सुटे भाग घेणार आहोत आणि ते प्रमाण ५० टक्क्यावर जाईल. सध्या कमिन्स कडून इंजिन पुरवठा आम्हाला होतो. गोव्यातील पुट्समायझर ही कॉंक्रिट क्षेत्रातील कंपनी आम्ही विकत घेतली आहे . तिची ४०० कोटी रुपये उलाढाल आहे.
मोठी धरणे , रस्ते, कोळसा खाणी , बंदरे या ठिकाणी लागणारी यंत्रे येथे तयार केली जाणार आहेत असे नमूद करून ते म्हणाले की जगात १२५ देशात आमचे प्रकल्प असले तरी भारतातील प्रकल्पाशिवाय विस्तार होऊ शकणार नाही. कारण भविष्यात येथील बाजारपेठ वाढणार आहे. सध्या एस्काव्हेटरला चांगली मागणी आहे. श्रीलंकेला येथून निर्यातही केली जाते.
मुख्य कार्यकारी अधिकारी टी. आर. बद्रीनारायण म्हणाले की भारतात पायाभूत सुविधा निर्मितीच्या प्रकल्पांना लवकर संमती मिळणे आवश्यक आहे. चीन हा भारताचा स्पर्धक नसून मित्र आहे हे सानी हेवी इंडस्ट्री ने केलेल्या गुंतवनुकीवरून स्पष्ट होते ; स्थिर सरकार आणि पर्यावरणाच्या मुद्द्यावर वेळेत तोडगा ही आमची अपेक्षा आहे. चाकण भागातील १५० लोकांना या उद्योगमुळे थेट रोजगार मिळाला असून ही संख्या २०१४ अखेर दुप्पट होईल असा अंदाज आहे.

Leave a Comment