‘घनचक्कर’ मधून संजय पडला बाहेर

अभिनेता संजय दत्त १९९३ मधील मुंबईमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातून बाहेर पडला आहे असे वाटत होते. मात्र त्यामध्ये तो अडकून पडला आहे. घरामध्ये हथियार ठेवल्याप्रकरणी अभिनेता संजय दत्तला सुप्रीम कोर्टने पाच वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे संजय दत्त चांगलाच अडचणीत सापडला आहे.

या सर्वप्रकारामुळे संजयचे करियर अडकून पडले आहे. संजय दत्तला कोटातून चार आठवड्याची सवलत दिली आहे. त्यामुळे त्याला येत्या काळात अर्धवट असलेल्या सिनेमासाठी वेळ द्यावा लागणार आहे. वेळ मिळत नसल्याने त्याला काही सिनेमे सोडवी लागणार आहेत. आगमी काळात संजय विद्या बालन आणि इमरान हाशमीचा ‘घनचक्कर’ हा सिनेमा सोडत आहे.या सिनेमाच्या शूटिंग साठी त्याच्याकडे वेळ नाही. ‘ घनचक्कर’ या सिनेमात विद्या बालन आणि इमरान हाशमी यांच्यासोबत मुख्य भूमिका संजय दत्त करीत होता. मात्र त्याच्याकडे वेळ नसल्याने ‘घनचक्कर’सिनेमा सोडवा लागला आहे.

या चार आठवड्यात संजय दत्तने ‘पुलिसगीरी’ हा सिनेमा पूर्ण करण्यासाठी वेळ दिला आहे. त्याशिवाय आगमी काळात येत असलेल्या ‘पीके’ आणि ‘जंजीर’ या सिनेमाची शूटिंग पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.