आयपीएल -६ – संपूर्ण जगात प्रसारण होणार

नवी दिल्ली दि. २ – इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल)सहाव्या सत्रातील सामन्याचे थेट प्रसारण जगात टेलीव्हिजन, मोबाइल तसेच इंटरनेटसहित सर्व संचार माध्यमाद्वारे होणार आहे. आयपीएलच्या सहा सत्राच्या थेट प्रसारणासाठी ११ प्रसारण कंपन्यांनी पूर्ण जगात प्रसारण करण्याचे हक्क खरेदी केले आहेत. भारतीय उपमहाद्वीपच्या व्यतिरिक्त इंग्लंड, अमेरिका, अफ्रिका, कॅनाडा, हाँगकाँग, न्यूझीलंड, कॅरेबियन द्वीप समूह तसेच अफगाणीस्तानचे क्रिकेट प्रेमी आयपीएल सामन्याचा आनंद घेवू शकणार आहेत.

या देशातील स्थानिक प्रसारण कंपन्यांनी आयपीएल-६ चा प्रसारण हक्क खरेदी केला आहे. इंग्लंडचे आयटीवी नेटवर्क लिमिटेड, कॅनाडाची रोजर्स स्पोर्ट्सनेट, अमेरिकेची विलो टीवी इंटरनॅशनल युनायटेड, न्यूझीलंडचा स्काय नेटवर्क लिमिटेड यांचा यात समावेश आहे.

अफगानिस्तानमध्ये या सामन्याचे प्रसारण मीडिया स्पोर्ट, दक्षिण अफ्रिका व अफ्रिकेचे सुपर स्पोर्ट, मध्य युरोपीय देशासाठी पेहला प्लेटफार्म, हाँगकाँगचा पीसीसीडब्ल्यू, भारतीय उपमहाद्वीपसाठी सेट मॅक्स तसेच कॅरेबियन द्वीप समूहाचे स्पोर्ट्स मॅक्स प्रसारण कंपनी करणार आहेत. या व्यतिरिक्त इंटरनेटवर आयपीएल-६ चे थेट प्रसारण बॉक्सटीवी डॉट कॉम आणि मोबाइलवर प्रसारण करण्यासाठी भारतात नेक्सजीटीवी व बॉक्सटीवीने तसेच भारताबाहेर प्रसारण हक्क बॉक्सटीवीने खरेदी केले आहेत. आयपीएल सामने व्हीडिओ फुटेड यूट्यूबवरही पाहता येणार आहेत.