मोदींचा वरचष्मा

एखादा नेता वर चढायला लागला की त्याच्या अंगातल्या दुर्गुणाकडे दुर्लक्ष होते पण त्या दुर्गुणांची मोठी किंमत पक्षाला आणि देशालाही भोगावी लागते. आता या गोष्टीची आठवण नरेन्द्र मोदी यांच्यामुळे झाली आणि त्याचबरोबर इंदिरा गांधी यांच्या संबंधातल्याही काही स्मृती जाग्या झाल्या. कारण नरेन्द्र मोदी यांची वाटचाल इंदिरा गांधी यांच्याच वाटेने चालली आहे. या वाटचालीचा रंग भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणीची निवड होत असताना आणि रंगपंचमीच्या दिवशीच दिसले आहेत. मोदी यांच्या तोडीचा नेता पक्षात नाही. पक्षाच्या निवडणूक समितीत मु‘यमंत्री नसतात पण या संकेताला अपवाद करून मोदी यांना या मंडळात जागा दिलीच आहे पण त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे अतीनिकटचे पण वादग‘स्त असलेले गुजराती नेते अमित शहा यांनाही पक्षाचे सरचिटणीस करण्यात आले आहे. राजनाथसिंह हे काही तत्त्वे पाळणारे नेते आहेत. अमित शहा याच्यासार‘या न्यायालयात खटले चालू असलेल्या नेत्याला त्यांनी सरचिटणीस कधीच केले नसते. ती जागा या माणसाला केवळ मोदी यांच्या आग‘हावरून मिळाली आहे यात काही वाद नाही. मोदित्व म्हणजे सगळीकडे आपलेच वर्चस्व असले पाहिजे हा अट्टाहास.
तो आता कार्यकारिणीच्या निवडीत चालला आहे आणि तो चालणार असे दिसत आहे. हे मोदित्व पक्षाला महागात पडणारे आहे. मोदी यांची निवड होताना कोणाचे पत्ते कट झाले आहेत यावर नजर टाकणे मोठेच उद्बोधक ठरणार आहे. कोणाचा तरी पत्ता कापल्याशिवाय राजकारणात कोणी मोठे होत नाहीत. ही गोष्ट मोदी यांच्यासाठीही खरी आहे.
मोदी यांनी आपल्याला तुल्यबळ ठरणारा नेता आसपासही असता कामा नये याची दक्षता घेत शिवराजसिंह चौहान यांंचे खच्चीकरण केले आहे. चौहान हे मध्यप्रदेशाचे मु‘यमंत्री आहेत. त्यांनी फार वादग‘स्त न ठरता मध्यप्रदेशात प्रगती करून दाखवली आहे. त्यांनी 2012 या वर्षात राज्याचा विकास दर 11 टक्के करून पक्षात आपणही मोेठी जागा निर्माण करू शकतो हे दाखवून दिले आहे. म्हणून मोदी यांना ते नकोसे झाले आहेत. मोेदी मोेठे व्हावेत आणि त्यांना कोणीही पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी निर्माण होऊ नये यासाठी कोणाकोणाला आपले करीयर मातीमोेल करावे लागणार आहे हे काही सांगता येत नाही. मोदी हुकूमशाही प्रवृत्तीचे आहेत असे म्हटले जाते. त्यांच्यापासून पक्षाने सावध राहिले पाहिजे असे काल काँग‘ेसचे नेते कपील सिब्बल यांनी म्हटले आहे.

त्यांचे हे प्रतिपादन केवळ पक्षांतल्या मतभेदांतून निर्माण झालेले नाही. त्यात काही तरी तथ्य आहे. कोणाला तरी मोठे करण्यासाठी इतरांना लहान करण्याचा हा उद्योग काँग‘ेसमध्येही गेली 40 वर्षे जारी राहिला आहे. त्यात सुरूवातीला इंदिरा गांधी यांनी आपल्याला वरचढ होऊ शकणारांना पक्षात त्रस्त तरी केले किंवा त्यांना पक्षाच्या बाहेर पडण्यास तरी भाग पाडले.

परिणामी पक्षात त्यांच्या क्षमतेचा कोणी शिल्लक राहिला नाही. इंदिरा गांधी यांच्या अंगात काही नेतृत्वाचे गुण तरी होते त्यामुळे पक्षाला तेवढी तरी उंची लाभली पण आताच्या काँग‘ेसची उंची सोनिया गांधी यांच्याएवढीच होऊन थांबली आहे. मोदी यांची प्रवृत्ती अशीच दिसत आहे. म्हणून त्यांनी कार्यकारिणीतून आपल्याला नको असलेली माणसे वगळायला लावली आणि आपल्या विश्‍वासातली माणसे नको असताना आत घेतली. भाजपाच्या या कार्यकारिणीवर एक नजर टाकली की एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, पक्षात आता असे नेतेच राहिलेले नाहीत की ज्यांना सारा देश ओळखतो. दहा वषार्र्ंपूवीं अशी स्थिती नव्हती. वाजपेयी आणि अडवाणी हे असे दोन नेते होते की ज्यांना देशाच्या सर्व राज्यांत ओळखले जात होते. प्रमोद महाजन यांनाही देशभरात अपील होते. आता मोदी यांच्याशिवाय कोणी नेता उरलेला नाही.

तसा विचार केला तर आता टीव्ही हे एक असे माध्यम आहे की, ज्यावर एकदा छबी दिसली की त्या माणसाला सारा देश ओळखायला लागतो. तसे अनेक नेते भाजपात आहेत आणि काँग‘ेससह सर्वच पक्षात आहेत पण तेवढयाने भागत नाही. टीव्हीवर होणारे दर्शन जनतेसाठी आश्‍वासक ठरले पाहिजे. ओळख झाल्यानंतर कामाची ओळख झाली पाहिजे. कामातून विचार प्रकट झाला पाहिजे. त्या क्षमतेचे नेते पक्षात जेवढे जास्त असतील तेवढा पक्ष मोठा होत असतो. अशी ओळख पटवायला लागते व्यक्तिमत्त्व. अर्थात व्यक्तिमत्त्वात केवळ दिसणे महत्त्वाचे नाही. अशा नेत्याच्या व्यक्तिमत्त्वाला झळाळी आणणारा खरा प्रभावी घटक असतो त्याचा अनुभव.

मोदी यांचा आज टीव्हीवरून जनतेवर राहुल गांधी यांच्यापेक्षा चांगला प्रभाव पडत आहे त्याला त्यांचा अनुभव आणि चिंतन कारणीभूत आहे. तसे नेते भाजपात किती याचा शोध घेण्यासाठी भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर नजर टाकली तर फार निराशा होते. राहुल गांधी यांची महत्त्वाकांक्षा पंतप्रधान होण्याची आहे किंवा त्यांनी पंतप्रधान व्हावे असे काँग‘ेस जनांना वाटते असे म्हटले की अनेकांच्या भुवया वर चढतात आणि राहुल गांधी यांचा अनुभव काय प्रश्‍न विचारला जातो पण हा प्रश्‍न काय केवळ राहुल गांधी यांनाच लागू आहे का? तो पूनम महाजन-रावबाबतही तो विचारता येतो.

Leave a Comment