भंडारा बलात्कार, खून प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

भंडारा: जिल्ह्यातील मुरमाडी येथील तीन सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर बलात्कार करून त्यांचा खून केल्या प्रकरणी स्थानिक पोलिसांना तपासात अपयश आल्यानंतर हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सुपूर्त करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधिमंडळात बोलताना दिली.

मुरमाडी (लाखनी) येथील ठवरेनगरातील तीन सख्ख्या बहिणी दि. १४ फेब्रुवारीपासून दुपारी शाळेतून बेपत्ता झाल्या होत्या. त्या रात्रीपर्यंत घरी न परतल्याने त्यांच्या आजोबांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. दि. १६ रोजी सायंकाळी राष्ट्रीय महामार्गावरील भगवान ढाबा मागील शेतातील विहिरीत त्याफ तीनही बहिणींचे मृतदेह आढळून आले.

या प्रकरणाने अनेकदा रंग बदलले असून या प्रकरणी स्थानिक पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाला एवढ कालावधी लोटल्यनण्तरही तपासात प्रगती नसल्याने विधिमंडळातील विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे, आमदार देवेंद्र फडणवीस आणि आमदार नाना पाटोळे यांनी या तपासाबाबत प्रश्न उपस्थित केले.

यावेळी बोलताना गृहमंत्री पाटील यांनी या मुलींच्या कुटुंबियांना भंडारा रुग्णालयात येण्यापासून रोखल्याने शवविच्छेदनाला १७ तास विलंब झाल्याचा खुलासा करण्याचा प्रयत्न केला. त्यांना का रोखण्यात आले याचा तपास केला जाईल; याची चौकशी करण्याची ग्वाही त्यांनी दिली. मात्र पोलिसांच्या तपासाबाबत या मुलींचे कुटुंबिय समाधानी नसतील तर आपण हा तपास सीबीआयकडे देऊ; असेही ते म्हणाले.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यात प्रगती केली नसून तपास सीबीआयकडे सोपवावा; अशी मागणी करणारे या मुलींच्या आईचे दि. २ मार्चचे मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेले पत्र आपल्याकडे असून उलट पोलीस आपल्याला हे पत्र मागे धमकावीत असल्याने संरक्षण मिळावी; अशी मागणी या मुलींच्या आईने म्हटले आहे; याकडे लक्ष वेधले असता गृहमंत्र्यांनी हा तपास सीबीआय कडे देण्याची घोषणा केली.

Leave a Comment