करीनाला आवडतो टी-शर्ट

लैक्मे फैशन वीकमध्ये नम्रता जोशीपुरा हिने तयार केलेले कपडे परिधान करून अभिनेत्री करीना कपूर रम्पवर उतरली होती. यावेळी ती खूपच सुंदर दिसत होती. यावेळी तिने नेहमीच घालण्यासाठी पायजामा आणि टी-शर्ट आवडतात असे सांगितले.

यावेळी मीडियाशी बोलताना करीना म्हणाली, ‘ सैफ अली खानला तिने घातलेले सर्वच प्रकरचे कपडे आवडतात. विशेष म्हणजे सर्वच रंग सुद्धा आवडतात. त्यामुळे मला सैफ विशिष्ट असे कपडे घालावेत म्हणून कधीच आग्रह करीत नाही.’

लग्न झाल्यानंतर प्रथमच अभिनेत्री करीना लैक्मे फैशन वीकमधील रम्पवर उतरली होती. त्यामुळे सर्वाना उत्सुकता लागली होती. यावेळी बोलताना करीनाने तिच्या आवडीची स्टाइल सुद्धा सर्वाना सांगून टाकली. तिला नेहमीचा पायजामा आणि टी-शर्ट घालण्यास आवडतात. पायजामा आणी टी-शर्ट घातल्यानंतर कम्फर्टेबल वाटत असल्याचेही तिने स्पष्ट केले.