नव्या बाटलीत जूनी दारू ‘हिम्मतवाला ‘

दाक्षिणात्य चित्रपटांचे हिंदी रिमेक, सिक्वेल नंतर आता वेळ आली आहे जुन्या हिंदी चित्रपटांच्या रिमेकची.अमिताभ बच्चन यांचा ‘अग्नीपथ’ ऋत्विकने सादर केलयानंतर आता जितेंद्रचा हिम्मतवाला अजय देवगणने आपल्या समोर आणला आहे. 1983 साली जुना हिम्मतवला आला होता तोच आता 30 वर्षानंतर नव्या रूपात पडद्यावर साजीद खानने साकारला आहे.

हिम्मतवाला ही रामनगर गावातील एका गरीब आईच्या मुलाची ही कथा आहे. रवीचे (अजय देवगण) वडील एका खेडेगावात मंदिरात पुजार्‍याचे काम्करत असतात. मात्र गावातील सरपंच शेरसिंह ( महेश मांजरेकर) त्यांच्यावर मंदिरातील दागिन्यांच्या चोरीचा आरोप करून बदनाम करता. या बदनामीस कंटाळून ते आत्महत्या करतात. आपल्या वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी सरपंचावर हल्ला करतो आणि गावातुन पसार होतो कालांतराने तो पुन्हा आपल्या गावात परततो. गावात त्याची आई सावित्री (झरीना वहाब), बहीण पद्मा (लीला जुमानी) राहतात.

साजिदच्या हिम्मतवालाची सूरूवात थॅक्स गॉड इत्स फ्रायडे आणि अश्रलिकडच्या काळातील चित्रपटात दाखविण्यात येणार्‍या फाईटने होते आणि नंतर थेट 80 च्या दशकात पोहचते. या गावापासून पोलिस 2 हजार किलोमिटर दुर आहेत. शेरसिंहचा मेव्हणा असलेला नाराययणदास (परेश रावल) आपल्या प्रत्येक वाक्यात मुंबई पासून मॉस्को आणि पुणे ते पॅरीस शहरांचा उल्लेख करतो तसेच त्याचा मुलगा विदेशात शिकायला आहे आणि गावात नाही तर गावकुसाबाहहेर राहणार्‍या मुलीवर प्रेम करतो. शेरसिंहची मुलगी रेखा (तमन्ना) शहरात शिकुन आलेली आहे. आय हेट गरीब असे सतत बोलते आणि गरिबाच्या प्रेमत पडते इतकेच नाही तर सतत मिनी स्कर्टमध्ये वावरत आसते आणि प्रेमात पडताक्षणी पंजाबी ड्रेस घालते. अजय आता माझी सटाली असा डडायलॉग मारतो आणि प्रेक्षकांना विचारतो आता मजा आली ना? यावरून साजिद खानच्या हिम्मतवालामध्ये नेमके काय भरलेले आहे याची पुरेशी कल्पना आपल्याला येइल यात शंका नाही.

ऐंशीच्या दशकात तयार होणार्‍या चित्रपटांची केमेस्ट्री साधी-सरळ असायची. इमोशन, ड्रामा, रोमान्स, अ‍ॅक्शन, हे सगळे काही एकत्र बघायला मिळत होते. अजय देवगणचा हिम्मतवालाहही त्याला अपवाद नाही. किंबहुन अलिकडच्या काळात बॉक्स ऑफिसवर यशस्वी झालेल्या चित्रपटांच्या यादीवर नजर टाकली तर अशाच प्रकारचे डोके बाजुला ठेऊन मनोरंजन करणारे चित्रपट यशस्वी झाले आहेत.

चित्रपट – ‘हिम्मतवाला’
निर्माता – वाशू भगनानी, सिद्धार्थ रॉय कपूर
दिग्दर्शक – साजिद खान
संगीत – साजिद-वाजिद
कलाकार – अजय देवगण, तमन्ना, परेश रावल, महेश मांजरेकर, अध्ययन सुमन.

अभिनयात परेश रावल यांनी पुन्हा एकदा आपली कमाल दाखवून दिली आहे. त्यांच्या अभिनयची छाप त्यांनी पुन्हा एकदा या चित्रपटावर सोडली आहे. ‘हिम्मतवाला’ या सिनेमातून तमन्ना भाटिया या दाक्षिणात्य अभिनेत्रीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. आपल्या अदाकारीच्या जोरावर तिने एन्न्ट्री केली असली तरी तिच्या अभिनयाबालबत नो कॉमेन्टस्. अजय देवगण त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये आहे. महेश माज़रेकरचा शेरसिंह फारसा प्रभाव पाडत नाही. हा हिम्म्मतवाला म्हणजे नव्या बाटतील जुनी दारू एवढेच आहे.

Leave a Comment