तिसर्‍या आघाडीला अडथळा

बेनीप्रसाद वर्मा यांचा ज्योतिषी नेमका कोणता याचा शोध सध्या घेतला जात आहे कारण त्यांनी उत्तर प‘देशातल्या आगामी लोकसभा निवडणुकीचे पूर्ण गणित मांडले आहे. समाजवादी पार्टीला 4, काँग‘सला 40, बहुजन समाज पार्टीला 36 आणि भाजपाला 10 जागा मिळतील असे त्यांनी म्हटले आहे अर्थात त्यांच्या या अंदाजाची बेरीज 80 पेक्षा अधिक होता कामा नये. कारण राज्यात जागाच मुळात 80 आहेत. पण ती 90 होत आहे आणि त्याची वर्मा यांना चिंता नाही कारण त्यांचा हेतू अचूक गणित मांडणे हा नसून मुलायमसिंग यादव यांच्या प्रभावाविषयी साशंकता निर्माण करणे हा आहे. तशी ती केली की त्यांचे तर बळ कमी होतेच पण तिसर्‍या आघाडीलाही पंक्चर करण्याचे श्रेय मिळते. कारण सध्या आपल्या देशात सध्या राष्ट्रीय पक्ष दुबळे होत आहेत आणि प्रादेशिक पक्ष प्रबळ होत आहेत ही वस्तुस्थिती काँग‘सच्या नेत्यांना अस्वस्थ करीत आहे.

गेल्या 20 वर्षांपासून ही प्रकि‘या सुरू झाली आहे आणि तिला बर्‍याच अंशी काँग‘सची धोरणेच कारणीभूत आहेत. खरे तर पूर्वी तामिळनाडू, पंजाब, महाराष्ट्र या राज्यातच प्रादेशिक पक्ष होते पण काँग‘समध्ये फूट पडून महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग‘स स्थापन झाला, प. बंगालात तृणमूल काँग‘सची निर्मितीही काँग‘ेसच्या पोटातच झाली,आंध‘ात याच पक्षातून व्हीएसआर काँग‘स हा प्रादेशिक पक्ष जन्माला आला.

जनता दलाच्या फुटीतून जनता दल(ए). जनता दल (से), बिजू जनता दल, राष्ट्रीय जनता दल, इंडियन नॅशनल जनता दल अशा या पक्षाच्या राज्य शाखाच नवे पक्ष बनल्या. आता भाजपातूनही कर्नाटक जनता पक्ष हा प्रादेशिक पक्ष निर्माण झाला आहे. देशाच्या 14 राज्यात हे पक्ष प्रबळ आहेत. येत्या निवडणुकीत केन्द्रात याच पक्षांची बेरीज मोठी झालेली दिसेल आणि दोन राष्ट्रव्यापी पक्षांना दुय्यम भूमिका वठवावी लागेल असे वाटत आहे. लालकृष्ण अडवाणी यांनी प्रादेशिक पक्षाविषयी असेच भविष्य वर्तविलेले आहे आणि ते बरेच वस्तुस्थितीच्या जवळ जाणारेे आहे. आज देशात नितीशकुमार, मायावती, शिबू सोरेन, ओमर अब्दुल्ला, चौताला, मुलायमसिंग यादव, ममता बॅनर्जी, नवीन पटनायक, करुणानिधी, बादल, ठाकरे, शरद पवार या सार्‍या प्रादेशिक नेत्यांच्या हातात जवळपास 140 खासदार आहेत. येत्या निवडणुकीत जयललिता, जगन मोहन रेड्डी, लालू प्रसाद यादव, हे नेते आणखी प्रभावी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 2014 सालच्या निवडणुकीनंतरचे बहुमताचे गणित काही वेगळेच असेल.

देशाचे राजकारण उत्तर प्रदेशात ठरते. कारण या राज्यात लोकसभेच्या 80 जागा आहेत. गेल्या जूनमध्ये तिथे विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकांनी समाजवादी पार्टीला भरभरून दिले. त्या निवडणुकीत झालेल्या मतदानाचा पॅटर्न कायम राहिला तर आणि आज या घडीला लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर समाजवादी पार्टीला किमान 45 ते 50 जागा मिळू शकतात. ही गोष्ट सांगायला कोणा विश्‍लेषण तज्ञाची साक्ष काढण्याची गरज नाही. पण खरेच तसे झाले तर तो एक इतिहास होईल. आजवर या पक्षांची तिसरी आघाडी तशी बर्‍याचदा प्रबळ बनून पुढे आली आहे. 1996 आणि 1997 अशी दोन वेळा त्यांची सरकारेही केन्द्रात आली होती. असे असले तरीही या आघाडीतल्या कोणत्याही एका पक्षाकडे 50 जागा नव्हत्या. पण आता मुलायमसिंग यादव हे हा विक‘म मोडून 50 खासदारांचे नेते झाले तर काय होईल या कल्पनेने काँग‘ेसच्या नेत्यांना कापरे भरले आहे. कारण त्या स्थितीत केन्द्रात प्रादेेशिक पक्षाचे सरकार आले तर त्या सरकारचे नेतृत्व मुलायमसिंग यादव यांच्याकडे जाऊ शकते. आज काँग‘ेसच्या नेत्यांनी मुलायमसिंग यांच्या डोक्यावर सीबीआय चौकशीची तलवार टांगती ठेवली आहे तशी मुलायमसिंग ठेवू शकतीलच पण ते काँग‘ेसपेक्षा भाजपाचा बाहेरचा पाठींबा पसंत करतील. अशा स्थितीत मुलायमसिंग यांचे पंख कापण्यासाठी बेनीप‘साद वर्मा यांचे शब्दांचे बाण मुलायमसिंग यादव यांच्यावर सोडले जात आहेत.
मुलायमसिंग यादव यांना लोकसभेच्या 50 जागा मिळता कामा नयेत हा आता काँग‘ेसचा मोठा प्राधान्याचा कार्यक‘म झाला आहे. बेनीप्रसाद यांचा हल्ला दोन हेतूने केला जात आहे. पहिला हेतू म्हणजे उत्तर प्रदेशातले कुरमी मतदार त्यांच्यापासून तोडणे आणि दुसरे म्हणजे मुलायमसिंगांना 50 जागा मिळणे शक्य नाही ही गोष्ट मुस्लिम मतदारांच्या मनावर बिंबवणे. कुरमी मतदार तोडण्याचे कारण असे की, सध्या हा ओबीसीतला वर्ग मुलायमसिंगांच्या मागे आहे. अनुसूचित जातींना बढतीत आरक्षण ठेवण्याच्या विधेयकावर मुलायमसिंग यांनी विरोधी भूमिका घेतली म्हणून सारा ओबीसी वर्ग त्यांच्या मागे उभा राहिला आहे. त्यातले कुरमी जातीचे मतदार मोठ्या सं‘येने आहेत. म्हणून बेनीप्रसाद या कुरमी नेत्याला मुलायमसिंगांची बदनामी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. एकदा कुरमी आणि यादव यांच्यात संघर्ष निर्माण केला की मुलायमसिंग यांचे बळ कमी होते. त्यांचे बळ कमी होऊन ते मोठ्या प्रमाणावर यशस्वी होणार नाहीत असे वातावरण तयार केेले की, मुस्लिम मतदारही त्यांच्यामागे उभे राहणार नाहीत आणि त्यांना 50 जागा मिळण्याची शक्यता कमी होईल. असे त्यांचे गणित आहे.