मध्य म्यानमार मधून मुस्लीम परागंदा

यांगूंन दि.३०- गेले काही दिवस मध्य मान्यमारमध्ये कडव्या बुद्धिस्टांनी चालविलेल्या हिंसाचारामुळे अनेक गांवातील मुस्लीम लोकांवर परागंदा होण्याची पाळी आली असल्याचे समजते. सिट क्विन या यांगूनपासून केवळ दोन तासांच्या अंतरावर असलेल्या छोट्याशा गावात तर एकही मुस्लीम राहिलेला नाही. २ हजार लोकवस्ती असलेल्या या गावात १०० मुस्लीम होते मात्र हिंसाचारात त्यांची दुकाने, घरे, मशिदी नष्ट झाल्यामुळे यातून बचावलेल्या मुस्लीमांवर निर्वासित छावण्यात आश्रय घेण्याची वेळ आली असल्याचे समजते.

आसपासच्या १० हून अधिक गांवातही बुद्धीस्टांच्या हिंसाचाराची छळ पोहोचली आहे आणि यातून वाचलेल्या मुस्लीमांनी नातेवाईक मित्रांकडे आश्रय घेतले आहेत.२० मार्चपासून सुरू झालेल्या या हिंसाचारात आत्तापर्यंत ४२ जणांचा बळी गेला आहे. इंटरनेटवरून होत असलेल्या प्रचारामुळे मुस्लीमविरोधी वातावरण देशात तयार होत असल्याचे सांगितले जात आहे. म्यानमार मध्ये बहुसंख्य बुद्धीस्ट असले तरी पाच टक्के मुस्लीम आहेत. म्यानमारची एकूण लोकसंख्या ६ कोटी असून त्यात यांगूनमध्ये मुस्लीमांची संख्या सर्वाधिक आहे.

Leave a Comment