सध्या ताकद विखुरलीय- अण्णा हजारे

नवी दिल्ली दि.३०- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे जनतंत्र यात्रेची सुरवात करण्यासाठी अमृतसरला रवाना झाले असून त्यापूर्वीच त्यांनी देशातीतल परिस्थितीत बदल घडवायचा असेल तर लोकांनी एकत्र येण्याची आणि संघटीत होण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. जनआंदोलनातूच देशाची परिस्थिती बदलेल असे सांगताना ते म्हणाले की नागरिकांत सध्याच्या भ्रष्ट सरकारविरोधात जागृती करणे गरजेचे आहे. देशातील सर्व जनतेला संघटित करावे लागेल आणि ही चळवळ सुरू ठेवावी लागेल.

अण्णा म्हणाले, जनलोकपाल बिल, राईट टू रिजेक्ट मिळविण्यासाठी आंदोलनाचाच मार्ग सच्चा मार्ग आहे. देशाच्या भल्यासाठी आणि देशवासियांच्या हितासाठी अनेक लोक आपापल्या परिने कार्य करत आहेत. मात्र या सार्‍या शक्ती सध्या विखुरलेल्या आहेत. त्या एकत्र येणे गरजेचे आहे. या सार्‍या संघटना शक्ती एकवटल्या तर देशाची परिस्थिती पाहता पाहता बदलणार आहे.

अण्णांची जनतंत्र यात्रा अमृतसरपासून सुरू होत असून ते पाच दिवसांत पंजाब मध्ये ८ सार्वजनिक सभा घेणार आहेत. सप्टेंबरमध्ये टीम अण्णांमधून बाहेर पडलेल्या आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांची काल रात्री अण्णांनी भेट घेतली असून त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली असे सांगण्यात येत आहे.

Leave a Comment