गेंड्यांची संख्या वाढत आहे

rhino

गतवर्षी आसाममध्ये आलेल्या महापुरात काझीरंगा अभयारण्य जलमय होऊन गेले. या अभयारण्या तील गेंड्यांना या संकटाशी मुकाबला कसा करावा हे काही कळले नाही. अभयारण्यातले पाणी वाढत चालले तसे हे गेंडे वाट फुटेल तिकडे पळत गेले. त्यातले जे गेंडे महामार्गावर आले त्यांची शिकार करण्यात आली. या महापुरामुळे गेंड्यांची संख्या कमी झाली. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत होती. मात्र यावर्षी या गेंड्यांची गणना केली असता त्यांची संख्या कमी नव्हे तर ३९ ने वाढली असल्याचे आढळले. वन्य जीवांच्या रक्षणासाठी धडपडणार्या  संघटनांसाठी ही एक शुभवार्ताच आहे. २०११ साली करण्यात आलेल्या पाहणीमध्ये काझीरंगा अभयारण्यातील गेंड्यांची संख्या २,२९० असल्याचे आढळले होते. परंतु आता ती संख्या २,३२९ झाली आहे.

या अभयारण्यातील मुख्य वन अधिकारी सुरेशचंद यांनी ही माहिती दिली. या अभयारण्यात गेंड्यांची मोठ्या प्रमाणावर हत्या केली जाते. कारण गेंड्याच्या शिंगाला परदेशात चांगली किंमत येते, म्हणून काही बेकायदा शिकार करणारे लोक गेंड्यांची शिकार करत असतात. २०१२ मध्ये या शिकार्‍याकडून ३५ गेंडे मारले गेले आहेत. त्याशिवाय नैसर्गिक कारणांनी ५० गेंडे मेलेले आहेत. ५० गेंड्यांचा मृत्यू सातत्याने येणार्‍या पुरामुळे झालेला आहे. अशा रितीने १३५ गेंडे मेलेले असताना सुद्धा गेंड्यांच्या एकूण संख्येत ३९ ची वाढ झाली आहे. यातले काही गेंडे आपापसातल्या भांडणात दुसर्याअ गेंड्यांकडून मारले गेलेले आहेत.

शिवाय या अभयारण्यात १०० वाघ आहेत. वाघांची गेंड्यांना तशी भीती नसते, परंतु गेंड्यांची पिल्ले मात्र वाघांच्या शिकारीला बळी पडतात. अशी काही पिल्ले मारली गेलेली आहेत. ती जर जगली असती तर गेंड्यांची संख्या अधिक वाढल्याचे  आढळले असते. जवळपास दीडशे गेंडे मेलेले असतानाही एकूण संख्येत ४० ने वाढ व्हावी याचा अर्थ या दोन वर्षात या अभयारण्यात जवळपास २०० गेंडे नव्याने जन्माला आलेले आहेत. गेंड्यांच्या या वाढत्या संख्येमुळे पर्यावरणाच्या रक्षणाला मदत होईल, असा विश्वास सुरेशचंद यांनी व्यक्त केला आहे. गेल्या आठवड्यात बेकायदा शिकार करणार्याा चौघांना अटक करण्यात आली. तेव्हा गेंड्यांची अप्रतिहत शिकार सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले होते. अशी शिकार जारी असेल तर गेंड्यांची संख्या टिकणार की नाही, असा प्रश्न विचारला जात होता. परंतु गेंड्यांच्या गणनेचे आकडे समोर आल्यामुळे पर्यावरणवादी संघटनांत आनंद व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment