पुणे दि. 29 : सहकारी क्षेत्रातील आघाडीच्या कॉसमॉस सहकारी बँकेला आणखी १८ नव्या शाखा सुरु करण्यास रिझर्व्ह बँकेने मान्यता दिली असल्याचे तसेच कोल्हापूर भागातील शिवाजी सहकारी बँक विलीन करण्याची प्रक्रियाही सुरु असल्याचे बँकेने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
बँकेच्या सध्या सहा राज्यात एकूण ११९ शाखा असून सध्याच्या नऊ विस्तारित कक्षांचे पूर्ण शाखेत रुपांतर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. एप्रिलच्या मध्यापर्यंत शिवाजी बँकेच्या विलीनिकार्नाची प्रक्रिया पूर्ण होईल असे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी कळविले आहे. दरम्यान उद्या ३१ मार्च रोजी बँकेच्या भागधारकांची विशेष सर्वसाधारण सभा होणार असून तीत काही प्रमाणात वसूल न होणारी कर्जे तालेबंदातून काढून टाकण्याच्या प्रस्तावावर विचार होणार आहे असे समजते . सभा होणार असल्याची पत्रे भागधारकांना पाठविण्यात आली आहेत.