नामवंत लेखक लक्ष्मण माने बलात्काराच्या आरोपामुळे वादाच्या भोवर्यात सापडले आहेत. आता आता महिलांवरच्या अत्याचाराचे प्रकरण पुढे आले की, पोलीस पटकन कारवाई करतात. म्हणजे या प्रकरणात माने समोर आले तर त्यांना विनाविलंब अटक होऊ शकते. माने या प्रकरणात दोषी आहेत की नाही हे माहीत नाही पण त्यांना अटक होणार हे नक्की आहे म्हणून ते आता अटक चुकवत आहेत. अर्थात त्यांना अटक फार दिवस चुकविता येणार नाही कारण ते फार दिवस असे परागंदा राहूही शकत नाहीत. कारण त्यांचा कारभार मोठा आहे. अशा माणसाला गुप्त राहणे फार दिवस शक्य होणार नाही. ते पोलिसांच्या हाती सापडणार. लक्ष्मण माने यांनी आपले उपरा हे आत्मकथन लिहिले आणि ते 1980 च्या दशकात गाजले. त्याचे काही परदेशी भाषांत अनुवादही झाले. माने यांनी राजकारणाची आवड आहे. त्यामुळे त्यांनी शरद पवार यांच्यामार्फत विधानपरिषदेचे सदस्यत्वही मिळवले होते. त्यांना एक संधी मिळाली. मात्र ते सतत वादाच्या भोवर्यात राहिले. त्यांनी आश्रमशाळा काढली. अशा शाळांचा मोठा व्याप त्यांच्यामागे आहे.
‘उपरा’कार अडचणीत
भटक्या विमुक्तांसाठी ते काम करतात. त्यांच्या आश्रमशाळांत भ‘ष्टाचार होतो अशी ओरड होत होती. तिच्यावरून वादंग माजले. त्यांच्या संघटनेतही मतभेद झाले. त्यांना केन्द्राने पद्मश्री हा किताब दिला आहे. तो त्यांना जाहीर झाला तेव्हा उघडपणे कोणी काही बोलले नाही पण, लक्ष्मण माने यांच्यापेक्षा मोठे अनेक लेखक मराठीत आहेत. त्या सर्वांना सोडून माने यांना हा मान कसा मिळाला असा प्रश्न निर्माण झालाच. म्हणजे त्यांची पद्मश्रीही वादग‘स्त आहे. एखादा माणूस त्याच्यावर आरोप व्हायला लागले की, त्यामागे कसला तरी कट आहे असा प्रत्यारोप करतो. लक्ष्मण माने यांनीही आपल्यावर झालेल्या आरोपाला कधी सरळ उत्तर दिले नाही आणि प्रत्येक वेळी त्यामागे कट आहे असाच प्रत्यारोप केला. असेही होऊ शकते. एखादा माणूस काही विशिष्ट हितसंबंधांना सुरूंग लावायला लागला की त्याला उध्वस्त करण्यासाठी कोणी तरी कट कारस्थान करू शकतो पण माने सध्या अशा कोणत्याच सामाजिक कार्यात सकि‘य नाहीत. मग त्यांच्या विरोधात कोणी तरी अशा कारवाया कशाला करेल ? त्यांच्यावर आता थेट बलात्काराचा आणि लैंगिक शोषणाचा आरोप लावण्यात आला आहे. त्यांच्या आश्रमशाळांतल्या चार महिला कर्मचार्यांनी या संबंधात पोलिसात फिर्याद दिली आहे.
नोकरीत कायम करतो, बदली करतो, पगारवाढ देतो अशी आश्वासने देऊन माने आपल्यावर लैंगिक अत्याचार करतात अशा तक‘ारी या चौघींनी केल्या आहेत. अशा फिर्यादींना दोन बाजू असतात. तशा त्या दाखल झाल्या की पहिला प‘श्न निर्माण होतो की, 2003 पासून असे अत्याचार होत होते तर या महिला इतके दिवस गप्प का बसल्या ? या प्रश्नाला सयुक्तिक उत्तर नसते. अशा प्रकारच्या प्रदीर्घ काळ चाललेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात असे प्रश्न नेहमीज निर्माण होत आले आहेत. पण तसा तो निर्माण करून पोलीस काही फिर्याद नाकारत नाहीत. अत्याचार होतही असतील आणि त्या महिला नोकरीमुळे दबून रहात असतील. शेवटी असे अत्याचार फारच झाल्याने एका महिलेने धाडस करून फिर्याद दिली की मग अन्यही पीडित महिलांना बळ येते आणि त्या तक‘ार करायला पुढे येतात. असेही घडू शकते. त्यामुळे या महिला इतके दिवस गप्प का बसल्या या एका प्रश्नाने अत्याचाराची शक्यता नाकारता येत नाही. केवळ यावरून हा सारा बनावट प‘कार आहे असाही आरोप करता येत नाही. माने इतके दिवस चार महिलांवर असे अत्याचार करीत असतील तर असा प्रकार लपून रहात नाही. सर्वांना माहीत होतो. कुजबुज तरी चालते.
अशी कुजबुज करणारा काही साक्ष द्यायला पुढे येत नाही आणि तिच्यावरून काही आरोप सिद्ध होत नाही पण अशा चर्चेतून असा काही प्रकार घडत असावा अशी शक्यता वाटायला लागते. या प्रकरणात अजून तरी लक्ष्मण माने हे स्वत: सापडत नाहीत. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असतानाही ते सापडत नाहीत. पण ते मोठे लेखक असल्याने त्यांना आताच कोणी फरारी म्हणत नाही. त्यांचा शोध जारी आहे. माने यांच्याशी संबंधित असलेल्या काही संघटनांनी यामागे काही हितसंबंधी मंडळींचा कट असल्याचा आरोप केला आहे तर भाजपा, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अटक करावी, तसेच या कारवाईत कसलाही राजकीय दबाव आणला जाऊ नये अशी मागणी केली आहे. एका माने समर्थक संघटनेने मात्र हा मनुवादी संघटनांचा कट असल्याचे म्हटले आहे. ही मात्र हद्द झाली. दरम्यान राष्ट्रवादी काँग‘सशी संबंधित शिक्षक संघटनेेने माने यांची पद्मश्री काढून घ्यावी अशी मागणी केली आहे. आता ही संघटना मनुवादी आहे असे काही म्हणता येणार नाही. माने हे माजी आमदार आहेत. शरद पवार यांचा उल्लेख ते नेहमी आमचे मित्र असा करतात. असा हा माणूस मोठा आहे. त्याच्यावर आरोप झाला की चर्चा होणारच. त्यावर चिडून चालत नाही. महिलां वरील अत्याचाराला वाचा फोडणार्या झुंजार नेत्या अॅड. वर्षा देशपांडे यांनी माने यांची बाजू घेऊन या महिलांचीच सीबीआय कडून चौकशी करावी अशी विक‘मी मागणी केली आहे.