
नवी दिल्ली दि.२९ – वीज आणि पाणी दरवाढ विरोधात बेमुदत उपोषणाला बसलेल्या आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांची प्रकृती अधिक बिघडली असल्याचे आज सांगण्यात आले. केजरीवाल यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस असून त्यांना मधुमेहाचा त्रास आहे. त्यांना तपासणार्या डॉक्टरांनी त्यांच्या लघवीतील केटेानचे प्रमाण अधिक वाढले असल्याचे सांगितले. उपोषणादरम्यान केजरीवाल यांचे वजनही सुमारे सहा किलोंनी कमी झाले आहे