मलालाच्या पुस्तकासाठी ३० लाख डॉलर्सची ऑफर

malala

लंडन दि. २८ – पाकिस्तानमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी आग्रही असलेल्या १५ वर्षीय मलाला युसुफ झाई या शूर मुलीबरोबर तिच्या आठवणी पुस्तकरूपाने प्रकाशित करण्यासाठी ३० लाख डॉलर्सचा करार करण्यात आला असल्याचे वृत्त आहे. या वर्षअखेर हे पुस्तक प्रकाशित होणार असून यूके आणि कॉमनवेल्थ येथील प्रकाशन वेडनफेल्ड अॅन्ड निकोलसन यांच्यातर्फे होणार आहे तर उर्वरित जगात हे प्रकाशन लिटल ब्राऊन यांच्यातर्फे केले जाणार आहे.

आय अॅम मलाला या नांवाने हे पुस्तक प्रकाशित होत आहे.या विषयी बोलताना मलाला म्हणाली की माझी गोष्ट मला सांगायची आहेच पण हेही खरे आहे की ही गोष्ट जगभरात शिक्षणापासून वंचित असलेल्या ६ कोटी १० लाख मुलांचीही आहे. जगातील सर्व मुलांना शिक्षण मिळावे या मोहिमेचा भाग बनण्याची संधी यामुळे मिळत असून हे पुस्तक जगात सर्वत्र पोहोचावे अशी इच्छा आहे. कांही मुलांसाठी शाळेपर्यंत पोहोचणे किती जिकीरीचे आहे याचे ज्ञान त्यामुळे जगातील सर्व नागरिकांना होऊ शकेल.

मलाला वर पाकिस्तानमध्ये तालिबानी अतिरेक्यांनी हल्ला करून तिच्या डोक्यात गोळी घातली होती. त्यानंतर तिला उपचारासाठी ब्रिटन येथे हलविण्यात आले होते. यातून मलाला आता पूर्ण बरी झाली असून ती ब्रिटनमध्येच शाळेत जाऊ लागली आहे. ती सध्या ९ वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे.

Leave a Comment