पोलिसांपुढे शरणागती पत्करणार , माफीसाठी अर्ज नाही – संजय दत्त

मुंबई दि.२८ – ’सर्वोच्च न्यायालयाबद्दल मला आदर आहे आणि न्यायालयाने दिलेली शिक्षा मला मान्य आहे. शिक्षा होऊ नये यासाठी आपण कोणताही अर्ज करणार नाही तसेच न्यायालयाने दिलेली मुदत संपण्यापूर्वीच आपण पोलिसांच्या स्वाधीन होणार आहोत’ असे बॉलीवूढ अभिनेता संजय दत्त याने सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. यावेळी संजूबाबाला अश्रू आवरता आले नाहीत. त्यांची बहिण खासदार प्रिया दत्त याही त्यांच्यासोबत उपस्थित होत्या. संजय दत्त यांनी प्रिया दत्त यांना मिठी मारून अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

संजूबाबा यावेळी म्हणाला की माझे देशावर प्रेम आहे. माझ्याहातून घडलेल्या गुन्ह्याची शिक्षा मला मिळाली आहे आणि त्याबाबत मी कोणताही दयेचा अर्ज करणार नाही. त्यामुळे या विषयावर आता चर्चा नकेा. जे या काळात माझ्या पाठिमागे खंबीरपणे उभे राहिले त्या सर्वांचा मी आभारी आहे. माझे कुटुंब सैरभैर झाले आहे. माझ्याकडे सध्या खूप काम आहे आणि ते सारे मला पूर्ण करावयाचे आहे. सर्वोच्य न्यायालयाने मला पोलिसांपुढे हजर होण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली होती मात्र ती संपण्यापूर्वीच आपण पोलिसांपुढे हजर होणार आहेात.

मुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट संदर्भातील खटल्यात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्त याला सर्वोच्च न्यायालयाने पाच वर्षे तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. संजयने यापूर्वी २००७ मध्ये १८ महिने तुरूंगवास भोगला असून त्यानंतर तो जामीनावर सुटला होता. गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने त्याला चार आठवड्यात पोलिसापुढे हजर होण्याची मुदत दिली होती.

Leave a Comment