विद्या पुन्हा कमी करतेय वजन

बॉलीवुडची डर्टी गर्ल विद्या बालन अभिनेता फरहान अख्तरसाठी तिचे वजन कमी करत आहे.गेल्या पाच आठवड्यात तिने दहा किलो वजन कमी केले आहे. यापूर्वी तिने डर्टी पिक्चरमधील दक्षिण भारतीय अभिनेत्री सिल्क स्मिताच्या भुमिकेसाठी वजन कमी केले होते. या सिनेमात तिने एक गर्भवती महिलाची भूमिका केली होती.

लग्न झाल्यानंतर विद्या बालनने ‘घनचक्कर’ या सिनेमासाठी तिला वजन वाढवावे लागले होते. या सिनेमातील हटके भूमिकेसाठी तिने वजन सुमारे १२ किलोने वाढविले होते. मात्र येत्या काळात विद्या फरहान सोबत ‘शादी के साइड इफेक्ट्स’ या सिनेमात काम करित आहे. त्यामुळे तिला पुन्हा वजन कमी करावे लागणार आहे. गेल्या पाच आठवड्यात तिने दहा किलो वजन कमी केले आहे.

लग्न झाल्यानंतर प्रथमच तिला वजन कमी करावे लागत आहे. त्यामुळे आगामी काळात तिला अभिनेता फरहान अख्तर सोबत सुट होण्यासाठी तिला आणखीन वजन कमी करावे लागणार आहे. यासाठी विद्याला मात्र व्यायाम आणि आहारावर लक्ष केंद्रित करावे लागत आहे. हे सर्व बिजी शेडूलमध्ये करतांना तिला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

Leave a Comment