नवी दिल्ली दि.२७ – इन्शुरन्स रेग्युलेटरी अॅन्ड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी म्हणजेच इर्डाने वाहनांच्या थर्ड पार्टी विम्यात सुमारे वीस टक्क्यांची वाढ केली असून ही वाढ १ एप्रिलपासून लागू होणार आहे. चलनवाढीचा दर आणि क्लेम सेटलमेंटचा इतिहास लक्षात घेऊन ही वाढ करण्यात आली असल्याचे अधिकार्यांदकडून सांगण्यात आले आहे.
मोटर विमा महागला
दुचाकी वाहने, प्रवासी गाड्या आणि व्यावसायिक वाहने या सर्वांसाठी ही वाढ लागू होणार आहे. त्यानुसार १००० सीसी पर्यंतच्या प्रवासी कारसाठी २० टक्के वाढ केली गेली असून यापुढे या वाहनांना वर्षाला ९४१ रूपये, ३५० सीसी पर्यंतच्या दुचाकी वाहनांना ८०४ रूयपे तर मालवाहतूक करणार्याव वाहनांना ४० हजार किलोपर्यंत वाहतुकीसाठी १५,०३५ रूपये यापुढे भरावे लागणार आहेत.
विशेष म्हणजे मालवाहतूक करणारी तिचाकी वाहने तसेच प्रवासी वाहतूक करणारी तिचाकी वाहने ( रिक्षा, सिक्स सीटर) यांच्या विमा रकमेत वाढ करण्यात आलेली नाही. मात्र सहा प्रवासी नेणार्या प्रवासी चारचाकी गाड्यांच्या विम्यात २० टक्के वाढ केली गेली आहे. इर्डाने मार्च २०१२ लाच ही वाढ सुचविली होती मात्र त्यावर वाहतूकदार संघटनांनी न्यायालयात धाव घेतल्यामुळे हा निर्णय लांबणीवर पडला होता. आता न्यायांलयानेच इर्डाच्या बाजूने निकाल दिल्याने विमा दरवाढीचा मार्ग मोकळा झाल्याने संबंधित अधिकार्यांानी सांगितले.