दुबई – नुकत्याच ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत फलंदाजी आणि गोलंदाजीत टीम इंडियाने शानदार कामगिरी केली. टीम इंडियाचा भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा, ऑफस्पिनर आर अश्विनने कसोटी क्रमवारीत आघाडी घेतली आहे. पुजाराने १२व्या हून सातव्या क्रमांकावर झेप घेतली असून, अश्विनने गोलंदाजांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर उडी घेतली आहे. अश्विनची ही कारकीर्दीतील सर्वश्रेष्ठ क्रमवारी आहे.
कसोटी क्रमवारीत पुजारा, अश्विनची आघाडी
ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना पुजाराने कोटलाच्या दुस-या डावात नाबाद ८२ धावा केल्या. त्याच्या या कामगिरीमुळे टीम इंडियाला विजय मिळवता आला. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने दोन स्थांनाची प्रगती करताना २४हून २२ वे स्थान मिळवले आहे. मुरली विजयने तीन स्थानांच्या प्रगतीसह ४० वे स्थान गाठले आहे.
गोलंदाजीत सरस कामगिरी करीत कोटलावर एका डावात पाच गडी बाद करून एकूण सात विकेट घेणारा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन दोन स्थानांच्या प्रगतीसह सहाव्या क्रमांकावर आला आहे. अश्विनची हीकारकीर्दीतील सर्वश्रेष्ठ रँकिंग ठरली आहे. त्यासोबतचकोटलावरील ऑस्ट्रेलियाच्या दुस-या डावात पाच गडी बाद करून सामन्यात सात विकेट घेणारा सौराष्ट्राचा डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाने आठ स्थानांची प्रगती केली आहे. तो आता २७व्या क्रमांकावर पोहोचला आहे. प्रग्यान ओझाच्या क्रमवारीत एका स्थानाची घसरण झाली असून, तो दहाव्या क्रमांकावर आहे.