पुणे- शहरातील कोथरुड परिसरातील एक सहा मजली इमारतीला सोमवारी मध्यरात्री आग लागली. या आगीत ४६ वाहने जळून खाक झाली असून दोन मजले भस्मसात झाले. आगीतून ५० जणांना सुखरुप वाचविण्यात यश आले आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ११ गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीत कसलीच जीवित हानी झाली नाही.आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
पुण्यातील आगीत ४६ वाहने जळून खाक
कोथरुडमधल्या त्रिमूर्ती हाईट्समध्ये रात्री दीडच्या सुमारास ही आग आली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ११ गाड्यांनी धाव घेतली. ही आग सकाळी विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले. इमारतीच्या तळमजल्यावर पार्किंगची सोय आहे. तेथील ४६गाड्या जळून खाक झाल्या.
या आगीत पहिला आणि दुसरा मजलाही भस्मसात झाला. या दोन मजल्यावर राहणा-यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याशिवाय याठिकाणी एक मोठे इलेक्ट्रॉनिक दुकान आहे. या दुकानाचे आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे. या इमारतीत राहणा-या ५० जणांना सुखरुप वाचविण्यात यश आले आहे. पोलिस घटनास्थळी पंचनामा करीत होते.
