एफबीआय ने वंशभेदाच्या गुन्ह्यांची नोंद ठेवण्याची मागणी

वॉशिग्टन दि.२६- अमेरिकेतील हिंदू, मुस्लीम, अरब आणि शीख यांच्याविरूद्ध होणार्यान वंशभेदी गुन्ह्यांची नोंद एफबीआयने ठेवावी अशी मागणी कॅलिफोनिर्यातील डेमोक्रेटिक पक्षाचे प्रतिनिधी जॉन गॅरामंडी यांनी केली असून तसे पत्रही एफबीआयकडे पाठविले आहे. त्यांच्या या मागणीला अन्य १०० लोकप्रतिनिधींनी पाठिंबा दिला आहे.

अमेरिका हे लोकशाही राष्ट्र आहे आणि वंशभेदी हल्ल्यात कांही वंशाविरूद्ध होत असलेल्या हल्लांची नोंद ठेवली जात नसेल तर ते लोकशाही प्रक्रियेसाठी योग्य ठरणार नाही असे गॅरामंडी यांचे म्हणणे आहे. ते म्हणाले की अमेरिकेवर झालेल्या ११ सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर अॅरिझोना येथे या हल्लयाशी कांहीही संबंध नसलेल्या शीख व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. अमेरिकेतील हिंदू, शीख, मुस्लीम आणि अरब यासारखे नागरिक वंशभेदी हल्ल्यांच्या भीतीखाली जगत आहेत. एफबीआयने अशा गुन्ह्यांची नोंद ठेवली तर या गुन्ह्यांची भयानकता आणि त्यांचे प्रमाण समजण्यास मदत मिळणार आहे.

एफबीआय दरवर्षी वंशभेदी गुन्ह्यांसंदर्भातला अहवाल सादर करत असते मात्र त्यात हिंदू, शीख , मुस्लीम आणि अरब यांच्या बाबत घडलेल्या या प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश नसतो. त्यामुळे ही मागणी केली असल्याचेही गॅरामंडी यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment