अहमदाबाद दि.२६ -भारत देश म्हणून आजही आपल्याला आदर्श आहे मात्र भारतात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देण्याची मात्र आपली अजिबात इच्छा नाही असे पोलाद सम्राट लक्ष्मीकांत मित्तल यांनी अहमदाबाद येथील एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.

आर्सेलर मित्तल कंपनीने ओरिसा येथे २००६ साली १२ एमटीपी क्षमतेचा पोलाद प्रकल्प उभारण्यासंबंधी करार करून ४० हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याचे ठरविले होते मात्र आज इतक्या वर्षांनंतरही हा प्रकल्प रखडला आहे. झारखंड येथील प्रकल्पही असाच रखडला आहे असे सांगून मित्तल म्हणाले की भारतात प्रकल्प मंजुरीस फारच वेळ लागतो. मनात इच्छा असली तरी येथील लाल फितीच्या कारभारामुळे गुंतवणूकदारास नैराश्य येते . त्यामुळेच यापुढे भारतात गुंतवणूकीस प्राधान्य देण्याचा आपला अजिबात विचार नाही असे त्यांनी सांगितले.
युरोप देशातून पोलादासाठीची मागणी ३० टक्कयांनी घटली असली तरी अद्याप चीन. भारत आणि आफ्रिकी देशातून पोलादाला चांगली मागणी आहे असेही ते यावेळी म्हणाले.