न्यूझीलंड-इंग्लंड कसोटी अनिर्णयित

ऑकलंड-आयसीसीच्या क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेला न्यूझीलंडचा क्रिकेट संघ इंग्लंडवर ऐतिहासिक मालिका विजय मिळवण्याचे स्वपन एक विकटने भंगले. त्यामुळे न्यूझीलंड-इंग्लंड कसोटी सामना अनिर्णयित राहिला.शेवटच्या दिवशी सहा विकेटची गरज असताना पाच विकेट घेतल्या. इंग्लंडने नऊ गडी बाद ३१५ धावा केल्या होत्या.

येथे सुरू असलेल्या तिसर्‍या कसोटीच्या चौथ्या दिवसअखेरीस इंग्लंडची अवस्था ४ बाद ९० अशी झाली असून अखेरच्या दिवशी त्यांना विजयासाठी आणखी ३९१ धावांची आवश्यकता होती. मंगळवारी डावाची पुढे सुरुवात केल्यानंतर प्रीरोरने ११० धावा करीत इंग्लंडवरिल पराभवाचे संकट टाळले.त्याला ब्रोड्ने चांगली साथ दिली.

२००६ सालामध्ये पदार्पण केल्यापासून न्यूझीलंडच्या संघात कायमस्वरूपी स्थान पक्के करण्यात अपयशी ठरलेल्या पीटर फुल्टने या कसोटीत कारकीर्दीतील पहिले व दुसरे शतक झळकावत न्यूझीलंडला संस्मरणीय विजयाची आस दाखवली होती. मात्र न्यूझीलंडच्या गोलंदाजना अपयश आले.

Leave a Comment