गुगल नेक्सस- ७ – भारतात विक्री सुरू

गुगलने त्यांचा नेक्सस सात हा टॅब्लेट गेल्या वर्षी अमेरिकेत लाँच केला असून भारतात या टॅब्लेटची विक्री सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे भारतात कंपनीच्या स्टोअरमधून विक्री होण्याचा पहिला मान या नेक्सस सात ने मिळविला आहे. भारतीय ग्राहक या टॅब्लेटसाठी गुगल प्ले स्टोअरमध्ये प्री ऑर्डर बुक करू शकणार असून नोंदणीनंतर तीन ते सात दिवसांत टॅब्लेट उपलब्ध होणार आहे. या टॅब्लेटची किमत आहे १५९९९ रूपये.

विशेष बाब अशी की गुगलचे अध्यक्ष एरिक श्मिड नुकतेच भारतात येऊन गेले आणि त्याचवेळी त्यांनी दिल्लीत बोलताना गुगलची उत्पादने भारतात स्टोअरमधून मिळत नसल्याबद्दल दिलगीरीही व्यक्त केली होती. त्यानंतर लगेचच हा टॅब्लेट भारतात गुगल स्टोअरमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे.

श्मिड यांच्या म्हणण्यानुसार भारतात नेक्सस उत्पादने ग्राहकांत लोकप्रिय आहेत त्यातही स्मार्टफोन आणि टॅब्लेट युजरमध्ये ती अधिक लोकप्रिय आहेत कारण ती अँड्राइड अनमॉडिफाईड व्हर्जनवरही चालू शकतात. गुगलची उत्पादने तुलनेते महाग आहेत आणि भारतातील ग्राहकांचा विचार करायचा तर त्यांना सहज परवडतील अशी उत्पादनेच द्यावी लागतात. नेक्सस सात भारतीयांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारे उत्पादन आहे.

नेक्सस सात साठी सात इंची स्क्रीन, १.२ मेगापिक्सल कॅमेरा, १६ जीबी स्टोअरेज. १ जीबी रॅम देण्यात आला असला तरी त्याला थ्रीजी सुविधा नाही असे समजते.