अमेरिकेवरून परतल्यानंतर रविवारी टायगर सलमान खानने दोस्त संजय दत्तची भेट घेतली.यावेळी त्यांनी संजयच्या घरी जाऊन त्याची आस्थेवाइकपणे चौकशी केली. सलमान गेल्या काही दिवसापासून उपचारासाठी अमेरिकेला गेला होता.त्यामुळे तो जोधपुर येथील कोर्टात हजर झाला नव्हता.
यापूर्वी अभिनेता संजय दत्त आणि सलमान खानने ‘साजन’ आणि ‘चल मेरे भाई’ सारख्या सिनेमात काम केले होते. मात्र आता दोघेपण गेल्या काही दिवसापासून संकटात सापडले आहेत.
सलमान खान रविवारी ६ वाजल्यापासून ते रात्री ११ वाजेपर्यंत संजयच्या घरी बसून होता. यावेळी दोघात बराच काळ चर्चा सुरु होती.
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी आर्म्स एक्टप्रमाणे दोषी आढलेल्या संजय दत्तला सुप्रीम कोर्टने पाच वर्षाची शिक्षा सुनावली आहे. तर दुसरीकडे २००२च्या हिट एंड रन केस मध्ये सलमान खानच्या विरुद्ध सोमवारी मुंबईच्या सेशंस कोर्टमध्ये सुनावणी होणार आहे.