फ्रान्सचा चिमणा शिलेदार म्हणून इतिहासाला ज्ञात असलेल्या नेपोलियन बोनापार्ट याने त्याच्या प्रथम पत्नीला साखरपुड्यानिमित्त दिलेल्या अंगठीचा लिलाव करण्यात येणार असून या अंगठीला साधारणपणे २० हजार डॉलर्स म्हणजे ११ कोटी रूपये बोली मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.ओनेस्ट ऑक्शन हाऊसतर्फे या अंगठीचा लिलाव केला जाणार आहे.
फ्रान्सला आपल्या अतुल पराक्रमाने अपूर्व दर्जा मिळवून दिलेल्या नेपोलियनची भेट जोसेफाईन हिच्याशी १९९५ च्या सप्टेंबरमध्ये झाली होती. त्यावेळी जोसेफाईन ३२ वर्षाची विधवा होती आणि तिला दोन मुलेही होती. नेपोलियन आणि जोसेफाईन यांचा विवाह ९ मार्च १७९६ ला झाला तेव्हा नेपोलियनने ही अंगठी जोसेफाईनला दिली होती. अश्रूच्या आकाराची एकमेकांच्या विरूद्ध बसविलेली दोन रत्ने त्यात असून ही अंगठी सोन्याची आहे. हिरा आणि नील अशी ही दोन रत्ने १ कॅरेट वजनाची आहेत.
मात्र विवाहानंतर नेपोलियन लगेचच फ्रान्स लष्कर प्रमुख बनला आणि त्याला इटालीत जावे लागले. नंतर नेपोलियन आणि जोसेफाईनने १८१० साली घटस्फोट घेतला. अंगठी लिलाव करणार्यांपनी या अंगठीला १३ ते २० हजार डॉलर्स किमत मिळेल अशी अपेक्षा व्यकत केली आहे.