लिनक्स आणि मोझिलाही आता स्मार्टफोन क्षेत्रात

सिडने दि. २५ – ओपन सोअर्स प्लॅटफॉर्मवर वापरल्या जाणार्यास  ऑपरेटिंग सिस्टीम लिनक्स आणि मोझिला फायरफॉक्स या वर्षी स्मार्टफोन बाजारात पदार्पण करत असून त्या गुगल अँड्राईड आणि अॅपलच्या आयओएसपुढे तगडे आव्हान उभे करतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मोझिला फौंडेशन या फायरफॉक्स ब्राऊझर विकसकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे सध्या  नवीन मोबाईल ऑपरेटिंग सिस्टिमसाठी १७ ऑपरेटर्सनी फायरफॉक्स ओएस फोन संदर्भात संपर्क साधला आहे. त्यात ब्राझिल, कोलंबिया, हंगेरी, मेक्सिको, मॉटेनगेरो, पोलंड ,सब्रिया, स्पेन, व्हेनेझुएला यांचा देशांचा समावेश आहे.

सॅमसंग या जगातील सर्वाधिक मोठ्या मोबाईल हँडसेट उत्पादक कंपनीने लिनक्सच्या ऑपरेटिंग सिस्टीम वापराबाबत विचार सुरू केला असल्याचेही समजते. सॅमसंग सध्या त्यांच्या स्मार्टफोनसाठी अँड्राईड ऑपरेटिंग सिस्टीमचा सर्वाधिक वापर करत असून हे प्रमाण ४० टक्के आहे. मात्र आता लिनक्सवर आधारीत ऑपरेटिंग सिस्टीमसाठी त्यांनी टायझेन असोसिएशनशी बोलणी सुरू केली आहेत असे समजते. टायझेन फ्रान्सचा ऑरेंज, जपानच्या एनटीटी डोकोमो, चीनच्या हुवाई आणि यूएसच्या इंटेलसाठीही ही उपकरणे देत आहे.

सॅमसंगच्या या पावित्र्यामुळे विश्लेषक चकीत झाले असून सॅमसंगचा हा प्रयत्न गुगलपासून दूर होण्यासाठी असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. टायझेन ही कदाचित त्याची किल्ली असेल असेही या विश्लेषकांचे म्हणणे आहे. सध्याच्या स्मार्टफोन बाजारात अँड्राईड. अॅपलचा शेअर ९० टकके इतका असून तिसर्यार क्रमांकावर ब्लॅकबेरी व मायक्रोसॉफटचा विंडो फोन आहे.