नवी दिल्ली- फिरकी गोलंदाज रविंद्र जडेजाने प्रभावी गोलंदाजी करत दुस-या डावात ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ तंबूत पाठवीला आहे. त्यामुळे टीम इंडियाला कांगारुंना व्हाईटवॉश देण्याची संधी निर्माण झाली आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेला चौथा कसोटी सामना तिस-याच दिवशी अतिशय रंगतदार अवस्थेत आला आहे. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव १६४ धावावर गडगडला. टीम इंडियाला विजयासाठी १५५धावांची गरज आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा टीम इंडियाने बिनबाद १८ धावा केल्या होत्या.
व्हाईटवॉशची संधी; कांगारुंचा दुसरा डाव गडगडला
रविवारी तिस-या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर टीम इंडियाचे दोन फलंदाज अवघ्या आठ मिनिटांमध्येच बाद झाले. भारताचा संघ २७२ धावांमध्येच गारद झाला. नॅथन लियॉनने सात बळी घेऊन टीम इंडियाला मोठी आघाडी घेण्यापासून रोखले. त्यामुळे केवळ दहा धावांचीच आघाडी घेता आली.
दुस-या डावामध्ये ग्लेन मॅक्सवेल सलामीला उतरला, परंतु, जडेजाने त्याचा त्रिफळा उडवून वॉटसनचा डाव उधळला. त्यानंतर वॉर्नरही लवकर बाद झाला. त्यालाही जडेजाने पायचीत केले. त्यानंतर फिल ह्युजेसला अश्विनने पायचीत केले. जडेजाने त्यानंतर एड कोवाना २४ धावांवर पायचीत केले. तर स्टीव्ह स्मिथ आणि मिशेल जॉन्सनचाही त्याने त्रिफळा उडविला. प्रग्यान ओझाने मॅथ्यू वेडला बाद करुन आठवा धक्का दिला. परंतु, पीटर सिडलने भारतीय गोलंदाजांना हैराण केले आहे. जेम्स पॅटिंसनसोबत त्याने भागीदारी करुन आघाडी दिडशेच्या जवळ नेली. अश्विनने सिडलला बाद करीत १६४ धावा त्त्यांचा डाव गुंडाळला अखेरच्या डावात १५५धावाच्या लक्ष्याचा पाठलाग करणे अवघड ठरू शकते. त्यामुळे टीम इंडिया आता कशी फलंदाजी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.