कर्नाटक निवडणुक मोदीसाठी कसोटी

नवी दिल्ली- कर्नाटक विधानसभेची निवडणूक ५ मे रोजी होणार आहे. या काळात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेची कसोटी लागणार आहे. मेमध्ये होणार्‍या या निवडणुकीत मोदी हे भाजपचे स्टार प्रचारक असणार आहेत. दक्षिण भारतातील इतर राज्यांत मोदींच्या प्रतिमेची जादू कितपत चालू शकेल, याचा अंदाज घेण्यासाठी ही निवडणूक महत्वपूर्ण ठरणार आहे. येथील यशानंतर मोदींना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करायचे की नाही ते ठरविता येणार आहे. त्यामुळे आगामी काळात मोदीच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.

मे महिन्यात कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी मे महिन्यात निवडणूक होत आहे. मतदान होणार आहे. माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पांनी पक्ष सोडल्याने येथील सत्ता कायम राखण्याचे आव्हान भाजपपुढे आहे. त्यामुळे पक्षाने प्रचाराची जबाबदारी भाजपचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी यांच्यावर सोपवली आहे.

स्टार प्रचारक नरेंद्र मोदी कर्नाटकात पक्षासाठी प्रचारसभा घेणार आहेत. भाजपपुढे या निवडणुकीत जदयू, काँग्रेससह येदियुरप्पांच्या पक्षाचेही तगडे आव्हान असणार आहे.त्यासोबतच आगामी काळात दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आदी राज्यांत मोदींची लोकप्रियता कितपत आहे, याची पडताळणी करता येणार आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडूंवर ही जबाबदारी सोपवली आहे. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर घटकांसोबत टॉक शो, ग्रुप टू ग्रुप चर्चेद्वारे नायडू मोदींची चाचपणी करणार असल्याचे समजते.

Leave a Comment