करुणानिधी यांनी केन्द्रातल्या संपुआघाडी सरकारचा पाठंबा काढून घेतला. सुरूवातीला असे वाटले होते की, हे नाटक असेेल कारण करुणानिधी हे मोठे संधी साधू नेते आहेत. ते सौदेबाजी करीत असतात. काही तरी मागणी असेल म्हणून रुसल्याचे नाटक करीत असावेत आणि रुसवा काढताच पाठींबा कायम ठेवतील. सरकारला काही धोका होणार नाही. नाही तरी राज्यातही त्यांच्या हातात सत्ता नाही. तेव्हा केन्द्रातल्या सरकारला असलेला पाठींबा काढून घेऊन तिथेही सत्ताहीन होण्यात त्यांचा काही फायदा नाहीच. हा विचार करून ते पूर्ववत संपुआघाडीत येणार असा काँग‘ेसच्या नेत्यांचा अंदाज होता. पण तो अंदाज चुकला. द्रमुकच्या 18 खासदारांनी आपले राजीनामे सरळ राष्ट्रपतींच्या हातातच सोपविले. काँग‘ेससाठी, नेमके पणाने बोलायचे तर पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासाठी ही गोष्ट अनपेक्षित होती. ते चिडले. सोमवारी पाठींबा मागे घेण्यात आला आणि गुरूवारी करुणानिधी यांचा मुलगा स्टॅलीन याच्या घरावर आयकर खात्याची आणि सीबीआयची धाड पडली. आमच्याशी पंगा घ्याल तर घरावर आयकराची आणि सीबीआयची धाड पडेल असा इशारा यातून द्यायचा होता असे वाटते. नाही तरी पाठींबा काढून घेताच दोन दिवसांनी धाडी पडतात याचा दुसरा अर्थ काय असेल ?
यूपीएचे टायमिंग
हा सूड घेण्याचा प्रकार आहे अशी प्रतिकि‘या स्टॅलीन यांनी व्यक्त केली. राजकीय वर्तुळातही अशीच भावना निर्माण झाली. केन्द्र सरकार आपली सत्ता टिकावी म्हणून आयकर खात्याचा, गुप्तचर संस्थांचा आणि सीबीआयचा असा वापर करीत असते. आंध‘ाचे मु‘यमंत्री राजशेखर रेड्डी यांचा भ‘ष्टाचार सुखाने चालला होता. नेमकेपणाने सांगायचे तर तो काँग‘ेस श्रेष्ठींच्या आशीर्वादाने चालला होता पण त्यांचे निधन होताच त्यांच्या मुलाने जगनमोहन रेड्डी याने आपल्या वडलांच्या पश्चात मु‘यमंत्रीपदावर दावा सांगायला सुरूवात करताच त्याच्यावर सीबीआयने धाडी टाकल्या. कोणीही काँग‘ेसच्या बाजूने असतात तेव्हा त्यांचा भ‘ष्टाचार सीबीआयला दिसत नाही. पण तो काँग‘ेसच्या विरोधात गेला की मात्र सीबीआयला धाडी टाकाव्या वाटतात. असा याचा अर्थ होतो. द्रमुकच्या बाबतीत असेच झाले. स्टॅलीनच्या मुलाने परदेशातून काही कार खरेदी केल्या आणि त्यांचे आयात शुल्क भरले नाही. ही गोष्ट सीबीआयला द्रमुकने पाठींबा काढून घेऊन सरकारला अडचणीत आणले तेव्हाच कळली का? यात सरकारचा सीबीआयचा राजकीय वापर करण्याचा हेतू स्पष्ट होतो.
असा काही आरोप करायला सुरूवात केली की सरकार खुलासे करते. सीबीआय ही स्वायत्त यंत्रणा आहे, तिने काय कारवाई करावी हे सरकार ठरवत नाही, तेव्हा चेन्नईत पडलेल्या धाडींशी सरकारचा काही संबंध नाही. असे स्पष्टीकरण सरकारने केले आहे. असे आहे तर पाठींबा काढण्याची वेळ आणि धाडींची वेळ एकच कशी, या प्रश्नाचे उत्तर काही सरकारला देता आलेले नाही. सीबीआयच्या कारवाईशी सरकारचा काही संबंध नाही हा सरकारचा दावा मात्र कायम आहे. सरकारने कितीही खुलासे केले तरी सीबीआयचा असा वापर सरकार करीत असते या आरोपातून सरकारची काही सुटका होत नाही. कदाचित सरकारला द्रमुक नेत्यांवर अशा धाडी टाकायच्या नसाव्यात असे दिसते. आताच त्यांना द्रमुकला पूर्ण झिडकारायचे नाही. पण सीबीआयच्या धाडींनी सरकारला खरेच कठीण प्रसंगाला तोंड द्यावे लागत आहे. द्रमुकशी असलेले संबंध बिघडण्याची पाळी आली आहे. म्हणून अर्थमंत्री पी. चिदंबरम चिडले आणि त्यांनी सीबीआयच्या अधिकार्यांना ही कारवाई थांबवण्याचा आदेश दिला. दिल्लीहून चेन्नईला गेलेले सीबीआयचे अधिकारी हात हलवत परत आले. आता या घटनेत एक विसंगती आहे हे चिदंबरम यांच्याही लक्षात आले नाही. सीबीआय ही संस्था स्वायत्त असून तिच्यावर सरकारचा हा अधिकार नाही असे म्हणणार्या पी. चिदंबरम यांच्या आदेशावरून सीबीआयने चेन्नईतली ही मोहीम थांबवली कशी आणि सीबीआयचा चमू परत कसा गेला ?
याचा अर्थ उघड आहे की, या ठिकाणी सरकारने सीबीआयला धाड टाकायला सांगितले नव्हते पण धाडीची मोहीम थांबवायला मात्र सांगितले आहे. स्वायत्त सीबीआयने अर्थमंत्र्यांचा हा आदेश मानला कसा ? चेन्नईच्या मोहिमेत काय घडले हे काही कळले नाही. अकरा ठिकाणी धाडी टाकल्या आणि काही माहिती मिळाली पण चेन्नईतल्या या घटनेचे परिणाम लखनौत झाले. बेनीप्रसाद वर्मा यांच्या शेरेबाजीमुळे संतप्त झालेले मुलायमसिंग आधी वर्मा यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याच्या मागणीवर ठाम होते. ते तसे राहिले आणि या मागणीवरून त्यांनी सरकारचा पाठींबा काढून घेेतला तर सरकार पडू शकते हे समजून चुकल्याने सरकारच्या नेत्यांची मोठी गोची झाली होती. मुलायमसिंग यांनी त्या दृष्टीने काही हालचालीही सुरू केल्या होत्या पण इकडे सीबीआयने चेन्नईत धाडी टाकल्या आणि मुलायमसिंग यांना हवा तो इशारा मिळाला. परिणामी वर्मा यांच्या हकालपट्टीवरून चिडलेले मुलायमसिंग हे नरम झाले. काही काँग‘ेसी नेत्यांनी मुलायमसिंग यांच्यावर स्तुतिसुमनेही उधळायला सुरूवात केली. आपण सरकारचा पाठींबा काढून घेतला तर सांप्रदायिक ताकदे बढेंगी याचा साक्षात्कार मुलायमसिंग यांना झाला. काँग‘ेसला हेच हवे होते.