अभिनेता संजय दत्तला शिक्षा झाल्यापासून टीवी चैनलच्या कैमराची संजय दत्तच्या घरा बाहेर गर्दी आहे. शुक्रवारी दिवसभर संजय अथवा त्याची पत्नी मान्यता कोणीच घराबाहेर आले नाही. त्याशिवाय लहान मुलगा साहरान अथवा मुलगी इकरा देखील बाहेर दिसली नाही. संजयच्या बहिण खासदार प्रिया दत्तने मात्र संजयची भेट घेतली मात्र तिने प्रेससोबत चर्चा करण्यास नकार दर्शविला.
प्रभू देवाला पाहवी लागली संजयची वाट
गेटवर उपस्थित गार्डने अनोळखी व्यक्तिला घरी जाऊ दिले नाही. एवडेच नव्हे तर सुरक्षा रक्षकांनी कुणालाच आत जाऊ दिले नाही. ऐक्टर प्रभु देवाला सुद्धा बराच वेळ ताटकळत घरा बाहेर थांबावे लागले होते. अभिनेता तथा दिग्दर्शक असलेल्या प्रभु देवाला गेटवरील गार्डने ओळखले नसल्याने त्याला घराबाहेर थांबावे लागले.
प्रभुदेवा शिवा दिवसभर करन जौहर, अजय देवगन, अभिषेक बच्चन, डेविड धवन, मिलन लूथरिया, संजय कपूर, राज कुंद्रा, रितिक रोशन याशिवाय अनेक बॉलीवूडमधील दिग्गज मंडळींनी संजयच्या घरी येऊन त्याची भेट घेतली.