
नवनिर्वाचित पोप फ्रान्सिस इस्टरच्या आधीची मास पुढच्या गुरूवारी रोममध्ये असलेल्या कॅसल डेम मर्मो युथ डिटेन्शन सेंटरमधील १२ तरूण कैद्यांचे पाय धुवून आणि त्यांच्या पायांचे चुंबन घेऊन साजरी करणार आहेत. पोप फ्रान्सिस मुनोस एरिसमध्ये आर्चबिचप असतानाही अशाच प्रकारे मास साजरी करत असत. व्हॅटिकन मध्ये ही मास रोम बॅसिलिका येथे साजरी केली जात असे पण पोप बेनेडिक्ट यांनी २००७ पासून युथ ङिटेन्शन सेंटरमध्ये कैद्यांचे पाय धुण्याची सुरवात केली होती असे सांगण्यात येते.