पेप्सी नव्या बाटलीत

न्यूयॉर्क दि.२३ – पेप्सीने नवीन आकाराची बाटली बाजारात आणली असून तब्बल १७ वर्षानंतर पेप्सीने बाटलीच्या आकारात बदल गेला आहे. ५६७ ग्रॅम पेय पावू शकणारी ही बाटली अधिक आकर्षक स्वरूपात सादर केली जात असून तिच्या बेसचा आकार सहज पकडता येईल असा बनविला गेला आहे. शिवाय पेप्सीचे वरचे रॅपही छोटे केले गेले आहे त्यामुळे बाटलीमधले पेय अधिक प्रमाणात दिसू शकणार आहे.

गेल्या कांही वर्षात पेप्सिको उत्पादनांची विक्री घसरत चालली असून प्रतिस्पर्धी कोकाकोलाने त्यांचे मोठे मार्केट काबीज केले आहे. पेप्सीकोची प्रवक्ती अँडे फूट या संदर्भात म्हणाली की कंपनी आपली विक्री वाढविण्यासाठी गेली कांही वर्षे सातत्याने उपाययोजना करत असून त्याचाच एक भाग म्हणून मार्केटिंग आणि पॅकेजिंगवर अधिक लक्ष दिले जात आहे. नवीन बाटल्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सर्वत्र उपलब्ध होतील मात्र जुन्या बाटल्या पूर्ण रिप्लेस करण्यासाठी कंपनीला १ ते २ वर्षे लागतील असा अंदाज आहे. पेप्सी बरोबरच कंपनी फ्रिटोल चीप्स, गॅटोरेड, क्वॅकर ओटस, मिनिट मेड अशीही उत्पादने बनविते.

Leave a Comment