एव्हरेस्ट मोहिमेतील अखेरचा शिलेदार जॉर्ज लोवे यांचे निधन

george

वेलिग्टन दि.२३ – सर एडमंड हिलरी आणि शेर्पा  तेनसिग यांनी १९५३ साली जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या एव्हरेस्टवर प्राणवायू सिलेंडर शिवाय चढाई करून पहिले मानवी पाऊल रोवले. त्या ऐतिहासिक मोहिमेतील त्यांचा साथीदार जॉर्ज लोवे यांचे ब्रिटनमध्ये वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले असून त्यामुळे ऐतिहासिक एव्हरेस्ट मोहिमेतील अखेरचा मोहरा आज गळून पडला आहे. हिलरी यांचे २००८ साली वयाच्या ८८ व्या वर्षी तर तेनसिंग यांचे १९८६ साली वयाच्या ७१ वर्षी निधन झाले होते. लोवे हे या मोहिमेतील एकमेव हयात गिर्यारोहक होते.

हिलरी आणि लोवे हे दोघेही न्यूझीलंडचे रहिवासी. लोवे हिलरी यांचे जिवलग मित्र तर होतेच पण या दोघांनी अनेक गिर्यारोहण मोहिमा बरोबर केल्या होत्या. एव्हरेस्ट मोहिमेमुळे मात्र त्यांना जागतिक प्रसिद्धी मिळाली होती. हिलरी आणि तेनसिग यांनी एव्हरेस्टवर शेवटची चढाई केली तेव्हा लोवे यांनी त्यांना फार मोलाची मदत केलीच पण त्या चढाईचे चित्रीकरणही त्यांनी कठीण परिस्थितीत केले. त्यावर बनलेल्या कॉन्क्वेस्ट ऑफ एव्हरेस्ट या डॉक्युमेंटरीला ऑस्करचे नामांकनही मिळाले होते.

लोवे यांच्या निधनाने सदा हसतमुख असणारा गिर्यारोहक हरपला आहे गिर्यारोहण क्षेत्रातील एका युगाचा हा अंत आहे असे हिलरी यांचे पुत्र पीटर याने श्रद्धांजली वाहताना म्हटले आहे.

Leave a Comment