
महाराष्ट्राच्या प्राप्तीकर लवादाने नागपूर येथील शिवमंदिराच्या वादाचा निर्णय देताना हिंदू हा धर्म नाही, असा निर्णय दिला. सध्या धर्माच्या अनुषंगाने बरेच वाद निर्माण होत आहेत. धार्मिक प्रवृत्तीच्या लोकांच्या मनामध्ये बरेच संभ‘म आणि गैरसमज निर्माण होत आहेत. विशेषत: महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारने धार्मिक आचारांच्या अनुषंगाने जादूटोणाविरोधी विधेयक मांडले आहे. ते अजून मंजूर झालेले नाही. परंतु अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ते लवकरात लवकर मंजूर केले जावे, असा आग‘ह धरला आहे. हिंदू धर्मातील काही संघटनांचा या विधेयकाला विरोध आहे आणि त्यावरून मोठा वैचारिक संघर्ष निर्माण झालेला आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या अस्वस्थतेच्या वातावरणातच हिंदू नावाची काही धर्म या भूतलावर अस्तित्वात नाही, असे प्राप्तीकर लवादाने दिलेल्या एका निवाड्यात म्हटले आहे. त्यामुळे काही लोकांच्या मनामध्ये अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी अस्वस्थता टाळण्यासाठी हा निर्णय नेमका काय आहे ते नीट पाहिले पाहिजे.
भारत ते श्रीलंका या दरम्यानच्या समुद्रामध्ये प्रभू श्री रामचंद्रांनी बांधलेला सेतू असल्याचे हिंदू धर्मीय मानतात. त्यावरून हा वाद निर्माण झाला, तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने याबाबत सरकारला काय म्हणायचे आहे ते सरकारने लेखी सादर करावे असा आदेश दिला. केंद्र सरकारच्या काही अधिकार्यांनी या संबंधात आपले म्हणणे मांडताना, प्रभू रामचंद्र ही एक कल्पना आहे. अशा प्रकारचा कोणी महापुरुष प्रत्यक्षात जन्मलेला नव्हता, असे प्रतिपादन केले. त्यावरून बराच वाद निर्माण झाला आणि हिंदुत्ववादी संघटनांनी त्यावर बरीच नाराजीही व्यक्त केली. आता पुन्हा एकदा तसाच प्रकार होण्याची शक्यता वाटल्यावरून प्राप्तीकर लवादाच्या या निर्णयाबाबत काही खुलासा करण्याची गरज निर्माण झाली आहे.
हिंदू या नावाचा धर्मच या जगात अस्तित्वात नाही असे कोणी भस्सकन् म्हटले की, आपल्या मनात पहिला प्रश्न निर्माण होतो की, या जगात जर हिंदू धर्मच अस्तित्वात नसेल तर मग आम्ही कोण आहोत? भारताच्या लोकसं‘ये मध्ये 82 टक्के एवढ्या प्रमाणात असलेले सारे हिंदू, हिंदू नाहीत तर कोण आहेत? अशा प्रश्नाने आपण हैराण होतो खरे; परंतु धर्म, पंथ आणि परमेश्वर प्राप्तीचे मार्ग यांच्या अनुषंगाने आपण जे बोलतो ते आणि शास्त्र सांगते ते यामध्ये तफावत असते आणि ती तफावत विचारात न घेता आपण धर्म हा शब्द बोलण्यात वापरत असतो. त्यातून धर्माविषयी अनेक गैरसमज निर्माण होतात. मात्र न्यायालये आणि लवादासार‘या यंत्रणा जेव्हा धर्माच्या संबंधाने काही निर्णय देतात तेव्हा त्यांना धर्माच्या व्या‘येचा काटेकोरपणे विचार करावा लागतो आणि तसा विचार करून न्यायालये काही निर्णय देतात. त्या निर्णयातली शब्दयोजना आपल्या बोलण्यातल्या योजनेपेक्षा वेगळी असल्यामुळे आपण ते निर्णय ऐकून अस्वस्थ होतो.
धर्माच्या व्या‘येच्या बाबतीत अशातूनच बरेच गैरसमज निर्माण झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निकालां मध्ये सुद्धा हिंदू हा धर्म नसून जीवनपद्धती आहे असे वारंवार सांगितले गेले आहे. साधारणपणे धर्म म्हणजे उपासना पद्धती, पूजा पद्धती किंवा परमेश्वर प्राप्तीचा मार्ग असे आपण समजतो. मुस्लिमांची परमेश्वराची कल्पना आणि त्याच्या प्राप्तीसाठीच्या उपासनेच्या पद्धती हिंदूपेक्षा वेगळ्या आहेत. त्यामुळे मुस्लीम हा एक धर्म आहे आणि हिंदू हा एक वेगळा धर्म आहे, असे वर्गीकरण आपण ढोबळ मानाने करतो. मुस्लिमांचे मंदिर नसते, ते मूर्तीची पूजा करत नाहीत. हिंदू मात्र (आर्य समाजासारखे काही अपवाद वगळता) मूर्तीची पूजा करतात. हा एक ठळक भेद हिंदू आणि मुस्लीम यांच्यात आहे. त्यामुळेच मुस्लीम हा एक धर्म असेल तर हिंदू हाही एक धर्मच आहे, असे मानले जाते.
असे असले तरी मुस्लीम, ख्रिश्चन या धर्माची काही वैशिष्ट्ये आहेत. त्यांचे धर्मसंस्थापक आहेत. इस्लामची स्थापना महंमद पैगंबर यांनी केली आणि कुराण हा त्यांचा पवित्र ग‘ंथ आहे. त्यांचा झेंडाही एक आहे. ख्रिश्चन धर्माची स्थापना येशू ख्रिस्तांनी केली. त्यांचा पवित्र ग‘ंथ बायबल हा आहे. बौद्ध, जैन यांचेही धर्मसंस्थापक भगवान गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर हे आहेत. हिंदुत्ववादी संघटना बौद्ध, जैन आणि शीख यांना वेगळे धर्म मानत नाही. ते हिंदू धर्मातलेच पंथ आहेत असे त्यांचे म्हणणे असते. परंतु त्यांचे संस्थापक ज्ञात आहेत आणि त्यांचे धर्मग‘ंथही वेगळे आहेत. त्यामुळे या सर्वांना धर्म म्हणता येते. हिंदू धर्माची स्थापना कोणी केलेली नाही. हिंदू धर्माचा एक झेंडा नाही आणि हिंदू धर्माचा एक सर्वमान धार्मिक ग‘ंथ नाही. त्यामुळे या अर्थाने मुस्लीम, ख्रिश्चन यांना जसे धर्म म्हणता येते तसे हिंदू धर्माला कायद्याच्या व्या‘येत धर्म म्हणता येत नाही. पण याउपरही हिंदू धर्माला धर्मच म्हणायचे असेल तर मुस्लीम, ख्रिश्चन, जैन, बौद्ध यांना पंथ म्हणावे लागेल. मात्र कायद्याच्या व्या‘येत रिलिजनला धर्मच म्हटले जाते आणि त्या व्या‘येत या सर्व पंथांना किंवा धर्मांना धर्म म्हणून संबोधले जाते आणि हिंदू धर्माला धर्म न म्हणता एक जीवन पद्धती असे म्हटले जाते.
अशा न्यायालयीन कामकाजात जेव्हा जेव्हा हिंदू धर्माची चिकित्सा होते तेव्हा त्या संबंधातील निर्णय देताना न्यायाधीश हिंदू ही जीवनपद्धती आहे, असे समजतात. पण त्याचा अर्थ नीट लक्षात आला नाही तर हिंदू धर्मियांच्या मनामध्ये उगाचच गैरसमज आणि अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता असते. ती टाळण्यासाठी या संकल्पना विचारात घ्याव्या लागतील.
