नो किस….नो बिकनी – तमन्ना

अभिनेत्री तमन्ना भाटियाने २००५ साली ‘चांद सा रोशन चेहरा’ या बॉलीवुडमधील सिनेमातून एंट्री केली. आगामी काळात तमन्ना लवकरच ‘हिम्मतवाला’ या सिनेमातून झळकणार आहे. येत्या काळात सिनेसृष्टीत टिकून राहण्यासाठी तमन्नाने किसिंग सीन आणि बिकनी घालण्यास नकार दर्शविला आहे. तिने नेहमी करताच बोल्ड इमेजपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत बोलताना तमन्ना म्हणाली, ‘मोठ्या पडद्यावर काम करीत असताना मी किस सीन करणार नाही. त्या सोबतच सिनेमात काम करताना बिकनीपण घालणार नाही. बॉलीवुडमध्ये टिकून राहण्यासाठी मी कधीच बोल्ड सीन करणार नाही. मला दक्षिण भारतीय सिनेमात खूप ऑफर मिळतात. मात्र मी सिनेमाची निवड करीत असताना प्रेक्षकांना पसंत पडतील अशा सिनेमाची निवड करते. त्यामुळे माझे सिनेमे हिट होत असतात.’

अभिनेत्री तमन्नाने वयाच्या २३ व्या वर्षी दक्षिणात्य सिनेमातून बॉलीवुडमध्ये डेब्यू केला होता. एका इंटरव्यूमध्ये ती म्हणाली होती की, मी फक्त असे सिनेमे साइन करत असते की ज्यामधून प्रेक्षकाना ख-या अर्थाने आनंद मिळावा.

Leave a Comment