नवी दिल्ली: श्रीलंकेतील तामिळ प्रश्नावर द्रविड मुन्नेत्र कळघमच्या तीन मंत्र्यांनी राजीनामे देवून अचानक राजधानीचे वातावरण गरम केले तर दुसर्या बाजूला तामिळ प्रश्नावरच तृणमूल काँग्रेसने सरकारला पाठिंबा जाहीर केला.

या बाबत राजधानीत पत्रकारांशी बोलताना तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, श्रीलंकेतील तामिळी बंधू आणि भगिनी यांच्या वेदना या आमच्या वेदना आहेत. त्यांचा तेथे छळ होत आहे. त्यांच्या भावनेचा आम्ही आदर करतो. आजपर्यंत जेंव्हा जेंव्हा तामिळींवर परदेशात संकट आले तेंव्हा तृणमूलने पक्षभेदाच्या मर्यादा विसरून आम्ही तामिळींच्या बाजूने उभे राहिलो. त्याच प्रमाणे आम्ही राजकीयदृष्ट्या सरकारच्या पाठिंब्याच्या भूमिकेत आहोत की विरोधात आहोत; या बाबत काहीही असले तरी केंद्रसरकारच्या परराष्ट्रधोरणाला आम्ही सर्व शक्तीनिशी पाठिंबाच दिला आहे. केंद्रात एका सरकारची सत्ता जाणे व दुसर्या सरकारची येणे ही सततची प्रक्रिया आहे. त्यामुळे जे सरकार केंद्रात ठाम भूमिका घेईल त्याला आमचा पाठिंबाच राहील. केंद्र सरकारनेही त्या त्या राज्यातील जनतेच्या भावनेचा आदर केला पाहिजे.
दरम्यान; द्रमुकच्या पाच मंत्र्यांनी राजीनामे दिले.