शस्त्रात्र निर्यातीत चीन पाचव्या स्थानावर

स्टॉकहोम दि. १८- गेल्या पाच वर्षांच्या काळात म्हणजे २००८ ते २०१२ या काळात चीनची शस्त्रास्त्र निर्यात तब्बल १६२ टक्कयांनी वाढली असून चीनने शस्त्रास्त्र निर्यातीत जगात पाचव्या क्रमांकाचे स्थान मिळविले असल्याचे स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटचा अहवालात नमूद करण्यात आले आहे. यामुळे चीनने ब्रिटनला १९५० पासून प्रथमच पहिल्या पाच क्रमांकातून खाली ढकलेले असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ब्रिटनचा या यादीत आता सहावा क्रमांक आहे.

शस्त्रास्त्र निर्यातीतील या वाढीमुळे चीन आठव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आला आहे. चीनच्या या प्रगतीला प्रमुख हातभार पाकिस्तानमुळे लागला असल्याचेही या अहवालात म्हटले गेले आहे. कारण चीनमधील शस्त्रास्त्र उत्पादनातील सर्वात मोठा आयातदार पाकिस्तान हाच आहे. पाकिस्तानचा चीनी शस्त्रास्त्र आयातीतील वाटा ५५ टक्के असून त्याखालोखाल म्यानमार ८ टक्के, बांगलादेश ७ टक्के असा आहे.

वरील संस्थेचे संचालक पॉल होल्टम यांच्या म्हणण्याप्रमाणे चीन अन्य देशांशीही शस्त्रास्त्र करार करत असून त्यांनी अल्जिरियाला  आठ थ्री फ्रिजेट, व्हेनेझुएलाला ८ ट्रान्स्पोर्ट विमाने तर मोरोक्कोला ५४ टँकची निर्यात केली आहे. शस्त्रास्त्र निर्यातीत जगात पहिल्या क्रमांकावर अमेरिका असून त्यांचा निर्यातीतील वाटा ३० टक्के इतका आहे. त्यानंतर रशिया दोन नंबरवर असून त्यांचा वाटा २६ टक्के तर जर्मनी, फ्रान्स यांचा वाटा अनुक्रमे ७ आणि ६ टक्के इतका आहे.

शस्त्रास्त्रे आयातदार देशात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. भारताची आयात १२ टक्के इतकी असून त्याखालोखाल चीन ६ टक्के, पाकिस्तान ५ टक्के, दक्षिण कोरिया ५ टक्के आणि सिंगापूर ५ टक्के अशी क्रमवारी आहे.

Leave a Comment