लक्झरी बस नदीत कोसळल्याने ३७ ठार

मुंबई- मुंबई-गोवा महामार्गावरिल खेडजवळ जगबुडी नदीत लक्झरी बस कोसळूल्याने ३५ जन ठार झाले. ही घटना मंगळवारी पहाटे ३.३० च्या सुमारास घडली. यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही बस गोव्यातील महाकाली ट्रॅव्हल्सची असल्याचे समजते. घटनास्थळी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे.

सोमवारी रात्री ही बस गोव्याकडून मुंबईकडे निघाली होती. पहाटे ३.३० च्या जगबुडी नदी पुलावरून ही बस जात असताना चालकाचा बसवरील ताबा सुटला. त्यामुळे ही बस पूलाचा कठडा तोडून खोल नदी पात्रात कोसळली. नदी पात्रातील खडकांवर बस आदळल्याने बसचा चेंदामेंदा झाला होता. प्रवासी गाढ झोपेत असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला. याबाबत माहिती मिळताच महामार्ग पोलीस तसेच वैद्यकीय पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. अंधारामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण झाले होते. बसमध्ये मृतदेह अडकल्याने गॅसकटरने बसचे पत्रे कापून मृतदेह काढावे लागले. सर्व ३७ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

मुंबईतील वांद्रे येथे जाणारे या बसमध्ये एक युरोपीयन जोडपेही होते. ते दोघेही जखमी झाले आहेत. बसचा चालक या अपघातात बचावला आहे. या अपघातात मरण पावलेल्याची ओळख पटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु होते.

Leave a Comment