आमिरने नाकारल्या दोनशे स्क्रिप्ट

अभिनेता आमिर खानच्या बैनरसाठी सिनेमा करीत असताना तीन स्तरीय मुल्यांकनमधून जावे लागते. त्यानंतरच आमिरखान या सिनेमाची निवड करतो. आमिर खान सिनेमा स्वीकारण्यापूर्वी पटकथेची संपूर्ण समीक्षा करीत असते. त्यामुळेच आमिरच्या प्रोडक्शन हाउसमध्ये सिनेमाला मंजुरी मिळणे शक्य नाही.

त्यामुळेच अभिनेता आमिर खानला बॉलीवुडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटले जाते. सिनेमातील त्याच्या रोलसाठी तो खूपच चूजी असतो. त्याच प्रमाणे तो प्रोडक्शन हाउसच्या कामात देखील खुपच्बिजी असतो. त्या ठिकाणच्या प्रत्येक कामात तो लक्ष देत असतो. जर आमिरला सिनेमाची स्क्रिप्ट आवडली तरच त्या सिनेमाला हिरवा झेंडा दाखविण्यात येतो. त्यामुळेच २०१० पासून ‘तलाश’ या सिनेमानंतर आमिरच्या प्रोडक्शन हाउसने कुठल्याच सिनेमाला हिरवा झेंडा दाखविला नाही.

त्यामुळेच गेल्या एक वर्षात २०० स्क्रिप्ट पसंत पडली नसल्याने त्यांनी धुडकावली आहेत.
यामध्ये विशाल भारद्वाज, रोहित शेट्टी, प्रदीप सरकार, प्रियदर्शन सारख्या अनेक दिग्गज दिग्दर्शकाचे प्रस्ताव आहेत. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार प्रोडक्शन हाउस फक्त त्याच पटकथावर सिनेमा बनविण्याचा विचार करते की, तो सिनेमा कुठ्ल्याच सिनेमाची नक्कल करीत नाही. आमिरला पण सिनेमाची स्क्रिप्ट थोडीसी हटके हवी असते.

Leave a Comment