चीनमध्ये बुद्धीमान मुलेच जन्मास येणार

बिजिंग दि.१९ – जगाची महासत्ता बनण्याची जिद्द बाळगून त्या दिशेने वेगाने वाटचाल करत असलेल्या चीनमध्ये आता यापुढे केवळ बुद्धीमान मुलेच जन्माला येतील असा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. जन्मास येणार्यान बाळाच्या मातापित्याना हे मूल गर्भात असतानाच ते किती बुद्धीमान असेल याचा अंदाज दिला जाणार आहे असे सूत्रांकडून समजते..

चीनमधील संशोधक त्या दृष्टीने कामाला लागले असून त्यांनी जगातल्या सुमारे २ हजार  स्मार्टेस्ट लोकांचे डीएनए सॅपल मिळविले आहेत. हे संशोधक आणि बिजिंग जेनोमिकस इन्स्टिट्यूट या जनुकांचा सिक्वेन्स लावण्यात गुंतले असून अतिबुद्धीमान लोकांच्या जनुकांची साखळी कशी असते याचा शोध घेतला जात आहे. ही साखळी एकदा उलगडली मानवाला बुद्धीमत्ता प्रदान करणार्याा जनुकांचा सिक्वेन्स निश्चित होणार आहे. त्यानंतर गर्भवती महिलेच्या गर्भाचे स्क्रिनिंग करून जनुकांची रचना या संशोधित साखळीनुसार केली जाणार आहे.

प्रत्येक पिढीत याच प्रक्रियेने आय क्यू म्हणजे बुद्ध्यांकात १५ ने वाढ करता येईल असाही या संशोधकांचा दावा आहे. जगाची फॅक्टरी म्हणून नांव मिळविलेल्या चीनने शोधलेली ही क्रांतीकारी पद्धत त्यांना त्यांच्या गरजेनुसार मुले मॅन्यूफॅक्चरिंगमध्येही उपयुक्त ठरते आहे का याची प्रतिक्षा जगभरात केली जात आहे.

Leave a Comment