साखळी चोर्‍या रोखण्याासाठी शस्त्राचाही वापर, ज्येष्ठ नागरिकासाठी हेल्प लाईनˆ -आर आर

पुणे, दि. 17 (प्रतिनिधी) -साखळी चोर्‍या रोखण्यासाठी वेळप्रसगी पुण्यात शस्त्राचा वापर केला जाईल व ज्येष्ठ नागरिकासाठी पुण्यात स्वतंत्र हेल्पलाईन सुुरु केली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री आर आर पाटील यांनी पुण्यात केली.
साखळी चोरीच्या गुन्ह्याबाबत दर तीन महिन्याला आढावा घेण्यात येणार आहे. यामध्ये ज्या पोलीस स्टेशन हद्दीत साखळी चोरीच्या घटना अधिक आहेत. तेथील संबधीत वरिष्ठ अधिकार्‍यावर कारवाई करू, असा इशारा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिला. साखळी चोरीच्या घटना रोखण्यासाठी वेळप्रसंगी शस्त्राचाही वापर करा, पुढे कोणाला काय उत्तर द्यायचे ते मी पाहतो, असा दिलासाही त्यांनी यावेळी पोलीस विभागाला दिला.
पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजीत ‘ज्येष्ठ नागरिक मेळावा 25 गावे विलनीकरणामच्या समारंभ प्रसंगी ते बोलत होते. आर. आर. पाटील म्हणाले, यावर्षी साखळी चोरीच्या गुन्ह्याचे प्रमाण वाढलेले आहे. मात्र, हे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण तुलनेत खूपच कमी आहे. तपासाचा वेग मंदावलेला आहे. ही गंभीर बाब असून, पोलिसांच्या संरक्षणासाठी दिलेल्या शस्त्राचा वापर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीही करा, ज्याला अटक केल्याची भाषा समजत नसेल तर, वेळप्रसंगी शस्त्राचा वापर करा. मात्र, साखळी चोरीच्या घटना ह्या थांबल्याच पाहिजेत.
ज्येष्ठ नागरिकाबाबत ते म्हणाले, पुण्यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांची मुले परदेशात किंवा बाहेरगावी असल्यामुळे त्यांना एकाकीपणा वाटतो. त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्‍न निर्माण होतो. या सर्व गोष्टीचा विचार करून, मुंबईच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली हेल्पलाईन आजपासून पुणे शहरातही सुरू करण्यात येइर्ंल
पाटील म्हणाले, बदलत्या जीवनशैलीमुळे एकत्र कुटुंब संपत चालले आहे. मुले परदेशात किंवा बाहेरगावी असल्यामुळे ज्येष्ठांना एकाकीपणा वाटतो. काही घरामध्ये तर एकच ज्येष्ठ व्यक्ती राहते. अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी पोलिसांच्या वतीने एक हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल. यासाठी पुणे पोलीस आयुक्तांनी पुढाकार घ्यावा.
या उपक्रमामध्ये ज्या घरामध्ये एकटे किंवा दोघे ज्येष्ठ नागरिक राहत असतील. त्यांच्या घरी जावून सर्व माहिती पोलीस ठाण्यात लिहून ठेवावी. दर महिन्याला एक कॅान्स्टेबल त्यांच्या घरी पाठवून, त्यांच्याशी गप्पा मारून, त्यांच्या आडीअडचणी जाणून घ्यावा. त्यांना कोणी त्रास देत असेल तर संबधीत व्यक्तीवर कडक कारवाई करावी. यामुळे नागरिकांना वाटणारा एकाकीपणा कमी होण्यास मदत होईल. ज्या ज्येष्ठ नागरिकांची मुले बाहेरगावी राहत असतील त्यांना मोनवरून सर्व माहिती कळवावी. या उपक्रमावर अधिकार्‍यांचे लक्ष असणार असून, याबाबत अढावा घेतला जाणार आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली. कार्यक्रमाच्या आगोदर आर. आर. पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जावून त्यांची अडीअडचणी जाणून घेतल्या.
पुणे आयुक्तालयात 25 गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढ झालेली आहे. हद्दीतील लोकसंख्याही वाढली असून, ठाण्याच्या नवीन हद्दीत आवश्यक ते बदल करावयाचे असेल तर तुम्ही करून शकता. पोलीस दलात असलेल्या मनुष्यबळाचा विचार करून पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये नव्याने पुर्नरचना करण्यास माझी मान्यता आहे, असे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगितले. नवीन पोलीस ठाण्याबाबत आयुक्त प्रत्यक्ष पाहणी करून शासनाकडे प्रस्ताव पाठवतील, असेही आर. आर. पाटील यांनी सांगितले.

Leave a Comment