पुणे, दि. 17 (प्रतिनिधी) – ‘पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई मुले यांचे नाव द्यावे. यासाठी आंदोलन करण्याची वेळ येते, ही महाराष्ट्रासाठी लांछनास्पद बाब आहे. सत्ताधारी मतांसाठी सावित्रीबाई मुले यांच्या नावाचा उदोउदो करतात. मात्र, कृतीच्यावेळी मुके-बहिरे होतात,म अशी टीका पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व माजी खासदार जोगेंद्र कवाडे यांनी केली.
ज्ञानज्योती सावित्रीबाई मुले विद्यापीठ नामकरण कृती समितीच्या वतीने आयोजित नामकरण निर्धार परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी कवाडे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अशी टीका केली. कार्यक्रमास पुण्याच्या महापौर वैशाली बनकर, आमदार माधुरी मिसाळ, बापूसाहेब पठारे, समितीचे स्वागताध्यक्ष डॉ. सुधाकर पणीकर, समितीचे निमंत्रक प्रा. गौतम बेंगाळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत, अखिल भारतीय महात्मा मुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे, प्रकाश ढाकणे, नंदा शर्मा, रेणू आगरवाल, पुरुषोत्तम खेडेकर, श्रीमंत कोकाटे आदी यावेळी उपस्थित होते.
मुले, शाहू, आंबेडकरांचे वारसदार सत्तेत असतानाही पुणे विद्यापीठाच्या नामांताराची मागणी करावी लागते. यातूनच वारसदारांचे नाकर्तेपण उघड होते, अशीही टीका कवाडे यांनी यावेळी केली. असे असले तरीही आमदारांनी व पुणे विद्यापीठाच्या अधिसभेने व व्यवस्थापन परिषदेने व पुणे महानगरपालिकेने नामांतराचा ठराव संम्मत करून शासनाकडे पाठवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याच बरोबर मुख्यमंत्र्यांशी नामांतराबाबत चर्चा करून आवश्यकता भासल्यास पुण्यातून मुंबई पर्यंत पायी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.
माधुरी मिसाळ म्हणाल्या, पुणे विद्यापीठाच्या नामांतरासाठी आंदोलन करण्याची वेळ येऊ नये. परंतु विद्यापीठाला सावित्रीबाई मुले यांचे नाव द्यावे. यासाठी मी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार आहे.
वैशाली बनकर म्हणाल्या, नामांतराचा प्रश्न लवकर मार्गी लागावा. यासाठी पुणे महानरपालिकेतर्मे सर्व प्रयत्न केले जातील.
