टायटानिक बुडताना वाजविले गेलेले व्हायोलिन सापडले

टायटानिक जहाजाला जलसमाधी मिळून आता १०० वर्षांचा काळ लोटला आहे. टायटॅनिकची दुसरी प्रतिकृती पुन्हा समुद्रात संचारण्यासाठी तयार होत असल्याच्या बातम्याही येत आहेत. मात्र टायटानिकला हिमनगाची टक्कर होऊन जलसमाधी घ्यावी लागली तेव्हा हे जहाज पूर्ण पाण्याखाली जाईपर्यंत वॉलेस हार्टले याचा बँड व्हायोलिन वाजवित होता. शेवटी या बँडलाही जहाजाबरोबरच जलसमाधीही मिळाली होती. ते ऐतिहासिक व्हायोलिन सापडले असून आत्तापर्यंत ते समुद्रात बुडून खलास झाले असावे असा समज होता.

जेव्हा टायटॅनिक बुडाले तेव्हा हार्टलेने हे व्हायोलिन त्याच्या कमरेशी कातडी पट्टाने बांधून घेतले होते असे त्या काळच्या फोटोवरून सिद्ध झाले आहे. बोट बुडल्यानंतर १० दिवसांनी हार्टलेचा मृतदेह मिळाल मात्र व्हायोलिन मिळाले नव्हते. ते त्यापूर्वीच कदाचित कोणी काढून नेले असावे किवा समुद्राच्या तळाशी गेले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. हे व्हायोलिन हार्टलेला त्याची वाग्दत्त वधू मारिया रॉबिनसन हिने वाङनिश्चयाची भेट म्हणून १९१० साली दिले होते. त्यावर तिने तसा मजकूरही कोरला होता. बोट बुडत असताना या व्हायोलिनवर वाजलेली शेवटची धून होती ‘ माय गॉड , टू दी ‘

मात्र २००६ साली हे व्हायोलिन जुन्या वस्तूंमध्ये ज्याला सापडले त्याने हे व्हायोलिन हार्टलेचेच आहे वा कसे याची खात्री पटविण्यासाठी तज्ञ आणि संशोधकांकडून सतत सात वर्षे हजारो पौंड खर्च करून चाचण्या करून घेतल्या असून आता हे व्हायोलिन हार्टलेचच असल्याचे निर्विवाद सिद्ध झाले आहे. व्हायोलिन भेावती असलेली चांदीची पट्टी अजूनही चांगल्या स्थितीत आहेच पण रोझवूड मध्ये बनविलेल्या या व्हायोलिनवर समुद्री पाण्याचे डागही आहेत. पाण्याच्या ओलेपणामुळे त्यावर दोन चरे पडले आहेत. आता या व्हायोलिनचा लिलाव हेन्री अलारिस हे करणार असून त्याला सहा आकडी भरभक्कम किंमत मिळेल असा अंदाज आहे..

टायटॅनिक आता जलसमाधी घेणार हे निश्चत झाले तेव्हा कॅप्टने हार्टले आणि त्याच्या साथीदारांना लोकांनी शांत राहावे म्हणून त्यावर संगीत वाजविण्यास सांगितले होते आणि बोटीतील लोक जीव वाचविण्यासाठी लाईफ बोटींचा आश्रय घेत असताना त्यावेळी केवळ चोवीस वर्षांचा असलेला हार्टले आपले हे प्राणप्रिय व्हायोलिन कमरेशी बांधून शांतपणे वाजवित होता. जिने ही पप्रेमाची भेट त्याला दिली होती त्या मारियाने नंतर कधीच लग्न केले नाही आणि ती १९३९ साली मरण पावली.

हे व्हायोलीन सध्या ज्या मालकाकडे आहे त्याने ते जेथे टायटानिक बोट बांधली गेली त्या गावात म्हणजे बेलफेस्ट येथेच प्रदर्शनात ठेवावे अशी इच्छा व्यक्त केली असून त्यानुसार हे व्हायोलिन या महिनाअखेर तेथे ठेवले जाणार आहे.

Leave a Comment