ऑस्‍ट्रेलियाचा पहिला डाव ४०८ धावात संपुष्‍टात

मोहाली- ऑस्‍ट्रेलियाच्या मिशेल स्‍टार्क आणि स्‍टीवन स्मिथने तिस-या दिवशी फलंदाजीचे शानदार प्रदर्शन करीत कांगारूंचा डाव सांभाळला. त्‍यांच्‍या चिकट खेळीमुळे कांगारूंना ४०० धावांचा टप्पा ओलंडता आला. अर्धशतकवीर स्‍टार्क आणि स्मिथ बाद झाल्‍यानंतर ऑस्‍ट्रेलियाचा पहिला डाव लवकरच संपुष्‍टात आला. ऑस्‍ट्रेलियाने पहिल्या डावात ४०८ धावा केल्या. रवींद्र जडेजा व इशांत शर्माने प्रत्येकी तीन बळी घेतले.

तिस-या दिवसही खेळ सुरु झाल्यनंतर डोहर्तीला पाच धावांवर अश्विनने बाद केले. डोहर्ती बाद होण्‍यापूर्वी मिशेल स्‍टार्क आणि स्‍टीवन स्मिथने फलंदाजीचे शानदार प्रदर्शन करीत कांगारूंचा डाव सांभाळला. त्‍यांच्‍या चिकट खेळीमुळे कांगारूंना ४०० धावांच्‍या पुढे आघाडी नेता आली. स्मिथचे शतक हुकल्‍यानंतर मिशेल स्‍टार्क आपले शतक पूर्ण करेन असे वाटत होते. मात्र, 99 धावांवर आल्‍यानंतर तो दबावात खेळू लागला. याचा अचूक फायदा घेत इशांत शर्माने टाकलेल्‍या चेंडूवर स्‍टार्क फसला आणि बॅटची कड घेऊन चेंडू धोनीच्‍या हाती विसावला.

टीम इंडियाकडून इशांत शर्माने तीन, आर. अश्विनने दोन, प्रग्‍यान ओझाने दोन आणि रवींद्र जडेजाने तीन विकेट घेतल्‍या. ऑस्‍ट्रेलियाकडून कोवान ८६, वॉर्नर ७१, स्मिथ ९२ आणि स्‍टर्काने ९९ धावा केल्‍या. उपहारानंतर टीम इंडियाचा डाव सुरु होणार आहे. त्यांच्या खेळीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment